Swami Shivanand Saraswati Dainik Gomantak
गोवा

Kavale Math: कवळे मठ स्वामींना दिलासा! फोंडा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा गोवा खंडपीठाकडून रद्द

Swami Shivanand Saraswati Kavale Math Case: पोलिसांनी जमीन विक्रीच्या व्यवहारासंदर्भातची कागदपत्रे मागविली होती. त्यामुळे स्वामीनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Sameer Panditrao

Kavale Math Case News Update

पणजी: कवळे मठाची जमीन विकताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी शिवानंद सरस्वती स्वामींविरोधात फोंडा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा (एफआयआर) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिकादार व प्रतिवाद्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आज रद्द केला. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असलेल्या स्वामींना दिलासा मिळण्याबरोबरच फोंडा पोलिसांना खंडपीठाने चपराक दिली आहे.

भूषण जॅक व डॉ. पी. एस. रामाणी यांनी या गैरव्यवहारप्रकरणी शिवानंद सरस्वती स्वामींसह अवधूत काकोडकर व मनोहर आडपईकर या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. फोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासकाम सुरू केले होते.

पोलिसांनी जमीन विक्रीच्या व्यवहारासंदर्भातची कागदपत्रे मागविली होती. त्यामुळे स्वामीनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्राथमिक सुनावणीवेळी या तपासकामाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती.

मात्र, उच्च न्यायालयाने तिला नकार दिला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या उत्तरादाखल प्रतिज्ञापत्रात गुन्हा रद्द करण्यास विरोध केला होता. प्रथमदर्शनी गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत असल्याने त्याची सखोल चौकशी करण्याची आवश्‍यकता आहे. संशयित तपासकामात सहकार्य करत नाहीत. १३ एप्रिल २०१८ रोजीचा विक्री करार मठाच्या विश्वस्त मंडळाकडून आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश बहुमताच्या ठरावाशिवाय करण्यात आला होता.

कवळे मठ आणि श्री गुरुदत्त संस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये १५ मार्च २००७ रोजी संमतीपत्र पारित करण्यात आले होते, जे उच्च न्यायालयाने मान्य केले होते. एकूण विश्वस्तांच्या दोन-तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर झाल्याशिवाय कवळे मठाच्या मालमत्तेची विक्री करता येत नाही. हे विक्रीपत्र अटींचे उल्लंघन करून अंमलात आणण्यात आले आहे अशी बाजू पोलिसांनी मांडली होती.

स्वामी यांनी जमीनविक्रीसंदर्भात केलेला व्यवहार दिवाणी स्वरूपाचा असताना फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे प्रकरण कवळे मठाअंतर्गत असल्याने फोंडा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा.

या प्रकरणावर पडदा पडलेला आहे व जो जमीनविक्रीचा व्यवहार केला आहे, तो रद्द करण्यात आला आहे. हे प्रकरण सहा वर्षांपूर्वीचे आहे. स्वामी शिवानंद सरस्वती यांचे कुटुंबच नाही. त्यामुळे हा गैरव्यवहार करून पैसे जमा करण्यात त्यांचा कोणताच उद्देश नाही. काही देवस्थान समित्यांच्‍या निवडणुका होणार होत्या. त्यामुळे जाणूनबुजून ही तक्रार दाखल करून स्वामींना बदनाम करण्यासाठी हा खटाटोप कवळे मठाच्या काही अनुयायांनी केला आहे.

जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा त्वरित विक्रीखत रद्द करण्यात आले. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले आहे. देवस्थानच्याच काही अनुयायांकडून ‘राजकारण’ केले जात आहे असा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. याचिकादारांतर्फे अभय खांडेपारकर यांनी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT