Kavale Math: कवळे मठाच्या स्वामींकडून तपासकामात असहकार्य, ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ अजून सादर नाही; कारवाई स्थगितीच्या विनंतीस नकार

Swami Shivanand Saraswati land dispute case: स्वामींच्या वकिलांनी आजही पोलिसांकडून कारवाई किंवा अटक केली जाऊ नये, यासाठी अंतरिम निर्देशाची विनंती केली.
Swami Shivanand Saraswati Kavale Math Case
Swami Shivanand SaraswatiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कवळे मठाच्या कथित मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासकामात शिवानंद सरस्वती स्वामींकडून सहकार्य केले जात नाही. या गुन्ह्याच्या तपासकामासाठी आवश्‍यक असलेला ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ हा महत्त्वाचा दस्तावेज अजून सादर केलेला नाही. या प्रकरणाचे तपासकाम प्राथमिक टप्प्यात आहे, असे प्रतिज्ञापत्र सादर करून फोंडा पोलिसांनी स्वामींच्या याचिकेला विरोध केला आहे.

स्वामींच्या वकिलांनी आजही पोलिसांकडून कारवाई किंवा अटक केली जाऊ नये, यासाठी अंतरिम निर्देशाची विनंती केली. त्याला पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला. ही सुनावणी ११ मार्चला ठेवली आहे.

मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीसाठी तिघा संशयितांना नोटिसा बजावल्या आहेत. शिवानंद सरस्वती स्वामी यांना कवळे मठ येथील, तर अवधूत शिवराम काकोडकर यांना ढवळी या रहिवासी पत्त्यावर पाठविलेल्या नोटिसा ‘सापडले नाही’ अशा शेऱ्यानिशी परत आल्या आहेत. स्वामी सध्या बेळगाव येथे असल्याने ते आले नाहीत. फोंडा उपनिबंधक कार्यालयातून १३ एप्रिल २०२८ रोजी केलेला मालमत्ता विक्रीखताचा दस्तावेज मिळवण्यात आला आहे.

कवळे मठाचे श्रीमद सच्चिदानंद सरस्वती यांचे ३ मार्च २००५ रोजी निधन झाले होते. त्यांच्या मृत्युचा दाखला घेण्यात आला आहे. मठ मालमत्तेच्या व्यवहाराला विश्‍वस्त मंडळाच्या दोन तृतियांश बहुमताशिवाय संमती देण्यात येऊ नये, असा ठराव असतानाही त्याचे उल्लंघन झाले आहे.

या मालमत्तेच्या विक्रीखताची प्रक्रिया श्रीमद सच्चिदानंद सरस्वती यांच्या निधनानंतर झाल्याचे दिसून येते. त्यासाठी ठरावही घेतलेला नाही असे तपासात समोर आले आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Swami Shivanand Saraswati Kavale Math Case
Kavale Math Conflict: कोर्टाच्या नियमावलींना बांधील असूनही तथ्‍यहीन दावे! कागदपत्रांवर खुद्द स्‍वामींची सही; जुन्‍या ‘विश्वस्त’ सदस्यांचा दावा

स्वामींच्या बदनामीसाठी तक्रार

शिवानंद सरस्‍वती स्वामी यांनी जमीन विक्रीसंदर्भात केलेला व्यवहार दिवाणी स्वरूपाचा असताना फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे प्रकरण कवळे मठांतर्गत असल्याने फोंडा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा.

या प्रकरणावर पडदा पडला असून जो जमीन विक्री व्यवहार केला आहे, तो रद्द करण्यात आला आहे.

हे प्रकरण सहा वर्षांपूर्वीचे असून स्वामींना बदनाम करण्यासाठी आता ही तक्रार केली आहे.

जेव्हा हा प्रकार उघडकीस आला, तेव्हा त्वरित विक्रीखत रद्द करण्यात आले.

दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले आहे, अशी बाजू याचिकादाराच्या वकिलांनी मांडली.

Swami Shivanand Saraswati Kavale Math Case
Kavale Math Conflict: कवळे मठाच्या स्वामींवर अटकेची टांगती तलवार; कथित मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

...या कारणांमुळे रखडले तपासकाम

१. फोंडा न्यायालयातील विक्रीखत प्रकरणात श्रीमद सच्चिदानंद सरस्वती यांचे निधन ३ एप्रिल २०१७ झाल्याची खोटी माहिती दिल्याचे तपासकामात समोर आले आहे.

२. शिवानंद सरस्वती स्वामी यांच्यासह इतर संशयितांना २० फेब्रुवारी २०१८ रोजी केलेली पॉवर ऑफ ॲटर्नीची मूळ प्रत सादर करण्यास सांगितले होते.

३. मात्र स्वामी सहकार्य करत नाहीत. त्यांनी अद्याप ती प्रत दिलेली नाही. त्यामुळे तपासकाम प्राथमिक टप्प्यात आहे.

४. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पुरेसा वेळ हवा व या प्रकरणाच्या निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी आवश्‍यक दस्तावेज जमा करण्यात येत आहेत.

५. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यासाठी केलेला शिवानंद सरस्वती स्वामी यांचा अर्ज फेटाळावा, असा दावा फोंडा पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गावस यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com