Rohan Khaunte Dainik Gomantak 
गोवा

'गोव्यात सॉफ्टवेअर टुरिझमला आहे वाव'

पर्यटनमंत्री रोहन खंवटे: क्रूज पर्यटनाला प्राधान्य द्यावे

दैनिक गोमन्तक

पणजी: आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणारा गोवा सुंदर समुद्रकिनारे, लख्ख सूर्यप्रकाश आणि समृद्ध निसर्ग यासाठी प्रसिद्ध आहे. आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सॉफ्टवेअर पर्यटनासाठीसुद्धा गोव्यामध्ये वाव आहे, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालयाच्यावतीने मुंबईत आयोजित पहिल्या ‘अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूज परिषदे’त ते बोलत होते.

खंवटे पुढे म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या गोवा लहान राज्य असले तरी पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे नोंदले गेले आहे.

आम्ही आता माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या आधारे गोव्याला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्याची लोकसंख्या 15 लाख असली तरी दरवर्षी 80 लाख पर्यटक गोव्याला भेट देतात. राज्य क्रूज पर्यटनाचाही उपयोग करत आहे. 2017 ते 2020 या काळात 1.49 लाख पर्यटकांनी क्रूझचा उपयोग केला. यात युरोपियन पर्यटकांचा समावेश मोठा आहे. व्यापार, पर्यटन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी एकत्रित काम केले, तर त्याचा सर्वच राज्यांना फायदा होणार आहे. प्रत्येक राज्याने ‘आऊट ऑफ बॉक्स’ जाऊन विचार केला पाहिजे. फक्त पर्यटनावर अवलंबून न राहता पर्यटनासाठीच्या अन्य गोष्टींचा विचार होणे आत्यावश्यक आहे. देश क्रूज हब म्हणून प्रसिद्ध होऊ पाहत आहे इतर राज्यांनीही क्रूज पर्यटनाला महत्त्व दिल्यास त्याचा फायदा संपूर्ण देशाला होईल.

तीन ट्रेनिंग अकादमी

या क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी गोवा, केरळ व पश्चिम बंगाल येथे क्रूझ ट्रेनिंग अकादमी स्थापन केल्या जातील, असेही केंद्रीय जलवाहतूकमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही; आपच्या कार्यकर्त्यांना मंत्री कामतांच्या जवळच्या व्यक्तीने धमकावल्याचा पालेकरांचा आरोप Video

Viral Video: आजीबाईंचा भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धूमाकूळ; नेटकरी म्हणाले, 'जुने खेळाडू मैदानात उतरले...'

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

SCROLL FOR NEXT