Ganesh Idol Artists Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idol Artists: बाप्पा पावला... गणेशमूर्ती कलाकारांना एक कोटींचं अनुदान वितरीत

गणेशमूर्ती कलाकारांसाठी आर्थिक मदतीच्या योजनेअंतर्गत सुमारे १ कोटींच्या अनुदानाचं वितरण करण्यात आलं आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा हँडीक्राफ्ट्स, रुरल अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी गुरुवारी गणेशमूर्ती कलाकारांसाठी आर्थिक मदतीच्या योजनेअंतर्गत सुमारे १ कोटींच्या अनुदानाचं वितरण केलं.

१२ तालुक्यांतील ३६९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, नोंदणीकृत ४५,२४४ गणेशमूर्तींसाठी एकूण ९०,४९,४०० वितरित करण्यात आले. याशिवाय १०% सेवा शुल्क म्हणून ९,०४,९४० मंजूर करण्यात आल्याने एकूण रक्कम ९९,५४,३४० इतकी आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी ६० चिकणमाती शुद्धीकरण यंत्रे उपलब्ध करून दिल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्या या पुढाकारामुळे गोव्यातील स्थानिक कलाकारांना मोठा आधार मिळाला असून, पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

यावेळी प्रवीण आर्लेकर म्हणाले की, गणेशमूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना सरकारच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जात आहे. याआधी कलाकारांना वेळेवर मदत मिळत नव्हती, परंतु यावेळी आम्ही ही मदत जलद गतीने पोहोचवली आहे. काही लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले असून काहींच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल.

आर्लेकर यांनी सांगितले की, पणजी बसस्थानक येथील हँडीक्राफ्ट एम्पोरियम आणि म्हापसा एम्पोरियम येथे कलाकारांना त्यांची उत्पादने विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कलाकारांनी आपली उत्पादने थेट विक्रीसाठी आणावीत. आम्ही ती उत्पादने खरेदी करण्यासही देखील तयार आहोत आणि त्यांचे पेमेंटही तत्काळ केले जाईल.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे आवाहन

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असेही आर्लेकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, लोकांनी चिकणमातीच्या गणेशमूर्तीच खरेदी कराव्यात. आम्ही पीओपी गणपतींवर कारवाई करणार आहोत. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी नागरिकांनीही याला साथ द्यावी, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT