Goa: 'गोवा रोबोटीक्स आणि कोडींगमध्ये देशाचे नेतृत्व करेल'; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

CM Pramod Sawant: रोबोटीक्स आणि कोडींग अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये यासंबंधीची रूची निर्माण केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
CM Pramod Sawant About Robotics
CM Pramod SawantX
Published on
Updated on

पणजी: रोबोटीक्स आणि कोडींग शिक्षणासाठी सुरू केलेल्या ‘केर्स’ योजनेतून आज अनेक विद्यार्थी घडत आहेत. रोबोटीक्स आणि कोडींगमध्ये आयटी हब असणाऱ्या बंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नईपेक्षा येत्या काळात गोवा रोबोटीक्स आणि कोडींगमध्ये देशाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पर्वरी येथे तंत्रशिक्षण संचालनालयात रोबोटीक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच ‘केर्स’ शैक्षणिक संसाधने आणि उत्पादनांच्या उदघाटनावेळी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, तंत्रज्ञान शिक्षण संचालक डॉ. विवेक कामत, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, ‘केर्स’चे नोडल अधिकारी डॉ. विजय बोर्जीस आणि मान्यवर उपस्थित होते. मागील काही वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५० टक्के जागा रिक्त राहायच्या; परंतु पुढील दोन वर्षांत एकही जागा रिक्त राहणार नाही. रोबोटीक्स आणि कोडींग अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये यासंबंधीची रूची निर्माण केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान

मुरगाव हायस्कूल, सडा येथील अमोल नाईक आणि शांतादुर्गा हायस्कूल, डिचोलीचे आदित्य नाईक यांना ‘केर्स क्रिएटिव्ह कंटेंट क्रिएटर २०२४’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गोवा कोडींग २०२४ स्पर्धा तालुका आणि राज्य स्तरावरील आघाडीच्या शाळांमध्ये तीन टप्प्यांत आयोजिली होती. त्यात ४,२०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

सहावी, सातवी, आठवीसाठी कोडींग आणि रोबोटीक्ससाठीच्या निवडक अभ्यासक्रम पुस्तिका, डिझाईन जर्नल्स, वर्कशीट्स, रोबोटिक्स हार्डवेअर किट आणि प्रोग्रामिंग, फाऊंडेशनल डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरील मॉड्यूल्स यासारख्या साधनांचा व्यापक संच आदींचे अनावरण केले.

बेब्रास इंडिया चॅलेंजमध्ये गोवा प्रथम ४ क्रमांकांसह गोव्यातील २२ विद्यार्थ्यांची अव्वल १०० विद्यार्थ्यांमध्ये निवड झाल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

CM Pramod Sawant About Robotics
Goa Tourism: फक्त बड्या बड्या बाता... पर्यटन विकासासाठी सरकार पावले उचलत नाही; CM समोर व्यावसायिकांनी मांडली व्यथा

कोडींगची खासियत

‘केर्स’सारखा रोबोटीक्स आणि कोडींगचा अभ्यासक्रम राबविणारे गोवा हे पहिले राज्य आहे.

४४२ शाळांमध्ये राबविण्यात येतो अभ्यासक्रम.

६५ हजार विद्यार्थी शिकतात रोबोटीक्स आणि कोडींग.

१० हजार विद्यार्थी रोबोटीक्स, कोडींगद्वारे घडवितात भविष्य.

CM Pramod Sawant About Robotics
'CM Pramod Sawant प्रति बांदोडकर, ब्रँड गोव्याचा प्रश्न येतो तेव्हा...'; आमदार व्हिएगस यांच्याकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव

यशाचे श्रेय शिक्षकांना

उच्च शिक्षणात नाविन्यपूर्ण रोजगारक्षम रोबोटीक्स आणि कोडींगचे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. पुढील दशकात गोव्यात या क्षेत्रात निश्‍चितपणे मोठी प्रगती होणार आहे. जे यश आमच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले, ते पाहून अभिमान वाटतो. याचे श्रेय रोबोटीक्सच्या शिक्षकांना जाते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com