Goa GST revenue collection, Goa GST refund data Dainik Gomantak
गोवा

GST: गोवा सरकारकडून 29137 कोटींचा महसूल जमा! राज्‍याला मिळाले 2039 कोटी; महसुलात वाढ

Goa GST Revenue Collection: वस्‍तू आणि सेवा कराच्‍या (जीएसटी) माध्‍यमातून राज्‍य सरकारने गेल्‍या पाच वर्षांत २९,१३७ कोटींचा महसूल जमा केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वस्‍तू आणि सेवा कराच्‍या (जीएसटी) माध्‍यमातून राज्‍य सरकारने गेल्‍या पाच वर्षांत २९,१३७ कोटींचा महसूल जमा केला. गत चार वर्षांत केंद्राकडून राज्‍याला परताव्‍यापोटी २,०३९ कोटी रुपये मिळाले आहेत.

केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. देशभरातील करप्रणाली सुलभ करण्‍याच्‍या हेतूने केंद्र सरकारने १ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी लागू केला. त्‍यापूर्वी देशात व्हॅट, सेवा कर, केंद्रीय उत्पादन शुल्क, मनोरंजन कर आणि जकात याच्या रूपात वेगवेगळे कर आकारण्‍यात येत होते. परंतु, जीएसटीच्‍या माध्‍यमातून हे सर्व कर एकत्रितरित्‍या जमा करण्‍यात येतात.

जीएसटीच्‍या माध्‍यमातून राज्‍य सरकारे केंद्राला प्रत्‍येक वर्षी जो कर जमा करतात, त्‍याचा परतावा म्‍हणून त्‍यातील काही वाटा केंद्राकडून राज्‍यांना देण्‍यात येतो. जीएसटीच्‍या माध्‍यमातून गोवा सरकारने गेल्‍या पाच वर्षांच्‍या काळात केंद्राला २९,१३७ कोटी रुपये दिले. त्‍याचा वाटा म्‍हणून राज्‍याला केंद्राकडून चार वर्षांच्‍या काळात २,०३९ कोटी रुपये मिळाले, असे मंत्री चौधरी यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

२०२१-२२ यावर्षी राज्‍यात जीएसटीच्‍या माध्‍यमातून ४,३४३ कोटींचा महसूल जमा झाला होता. पण, त्‍यातून गोव्‍याला किती वाटा मिळाला, हे उत्तरात सांगितलेले नाही. चालू आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत राज्‍यात ५,७७९ कोटींचा महसूल जमा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT