Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

Goa Diwali Vehicle sales: केंद्राने वाहनांच्‍या ‘जीएसटी’मध्‍ये कपात केल्‍यामुळे राज्‍यातील ग्राहकांनी वाहन खरेदीला अधिक पसंती दिल्‍याचे वाहतूक खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.
Goa diwali vehicle sales
Goa diwali vehicle salesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: केंद्र सरकारने वाहनांवरील ‘जीएसटी’मध्‍ये कपात केल्‍याने गतवर्षीच्‍या तुलनेत यंदाच्‍या दिवाळीत राज्‍यात वाहन खरेदीत वाढ झाली. दिवाळी सण गतवर्षी ऑक्‍टोबरमध्‍येच होता. त्‍यावेळी या महिन्‍यात १०,४९४ वाहनांची नोंदणी झालेली होती.

यंदाही हा सण ऑक्‍टोबरमध्‍येच आला. पण, यंदा मात्र ११,३१७ वाहनांची नोंदणी झाली. ऐन दिवाळीच्‍या तोंडावरच केंद्राने वाहनांच्‍या ‘जीएसटी’मध्‍ये कपात केल्‍यामुळे राज्‍यातील ग्राहकांनी वाहन खरेदीला अधिक पसंती दिल्‍याचे वाहतूक खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

Goa diwali vehicle sales
Electric vehicle: गोव्यात ई-वाहन विक्रीत घसरण! अनुदानातील बदल कारणीभूत; उद्योगांसाठी मोठा धक्का

गेल्‍या वर्षी दिवाळीचा सण २९ ऑक्‍टोबर ते ३ नोव्‍हेंबर या काळात झाला. त्‍या महिन्‍यात १०,४९४ वाहनांची नोंदणी झालेली होती. यंदाही हा सण ऑक्‍टोबरमध्‍येच आला. परंतु, यंदा गतवर्षीच्‍या तुलनेत ८२३ अधिक वाहनांची नोंदणी झाली. त्‍यात सार्वजनिक १,०५७, तर खासगी क्षेत्रात १०,२६० वाहनांची विक्री झाली.

Goa diwali vehicle sales
Traffic Police Vehicles: सुरक्षेबाबत गोवा स्वयंपूर्ण! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; वाहतूक पोलिसांना 50 दुचाकींचे वितरण

सवलत दिल्याने कंपन्यांना लाभ

दिवाळी पाडव्‍याच्‍या शुभमुहुर्तावर सोने, वाहनांसारख्‍या अधिक किमतीच्‍या वस्‍तूंच्‍या खरेदीस ग्राहकांची पसंती असते. त्‍यामुळे वाहन विक्री करणाऱ्या कंपन्‍या या काळात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूटही देत असतात. अशा स्‍थितीत यंदाही वाहन कंपन्‍यांनी ही सूट दिलेली असतानाच केंद्र सरकारनेही वाहनांवरील ‘जीएसटी’मध्‍ये कपात केली. त्‍यामुळे वाहनांच्‍या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्‍यामुळे गोमंतकीय जनतेही वाहनांच्‍या खरेदीस अधिक प्राधान्‍य दिल्‍याचे वाहतूक खात्‍याच्‍या आकडेवारीतून स्‍पष्‍ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa unregistered homestays action
Goa Congress Party Registration Dispute
iPhone 18 Pro Max Price in India
Goa Transport Department Action
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com