Chodan Bridge Dainik Gomantak
गोवा

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

Salvador do Mundo to Chodan bridge: गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे (जीएसआयडीसी) साल्वादोर दु मुंद ते चोडण या पुलासाठी २७४.८३ कोटी रुपयांची निविदा काढली

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्या तीस वर्षांपासून चोडण बेटासाठी स्वतंत्र पूल उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. आता गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे (जीएसआयडीसी) साल्वादोर दु मुंद ते चोडण या पुलासाठी २७४.८३ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. यासाठी ‘जीएसआयडीसी’ने ऑनलाईन निविदा मागविल्या आहेत.

साल्वादोर दु मुंद ते माडेल चर्च (चोडण) असा पूल उभारला जाणार असून, पात्र कंत्राटदारांकडून या निविदा ‘जीएसआयडीसी’ने मागविल्या असून, हा पूल तीन वर्षांत पूर्ण करण्याची अट कंत्राटदाराला असेल.

चोडण येथील रहिवाशांचे स्वप्न आता ३३ वर्षांनी पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. कारण मागील तीस वर्षांपासून पुलाचा प्रस्ताव केवळ कागदावरच होता. ‘जीएसआयडीसी’ने आता या पुलाची निर्मिती करण्यासाठी निविदा मागवून येथील जनतेला दिलासा दिला आहे, असे दिसते.

दोनशे मीटर लांबीचा हा पूल असणार असून, या पुलासाठी अधिगृहीत केलेल्या खासगी जागांसाठीची रक्कम सरकारने ईडीसीकडे सुपूर्द केली आहे. सुमारे १२.५ कोटी रुपये जमीनमालकांना अदा केले जाणार आहेत.

मागील म्हणजेच २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने या पुलासाठी अडीचशे कोटींची तरतूद केली होती. ही निविदा केवळ पुलांसाठीची असून, जोड रस्त्यांसाठी वेगळी निविदा ‘जीएसआयडीसी’ला काढावी लागणार आहे. या पुलामुळे चोडण आणि आसपासच्या गावांच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर इतर व्यवसायांनाही त्याचा फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर! प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे; 4 मे रोजी होणार मतमोजणी

Horoscope: 'या' राशींना होणार धनप्राप्ती! ग्रह देताहेत शुभसंकेत; कुणाला होणार फायदा? वाचा राशिभविष्य

LPG Gas Cylnder: गोव्यात भीतीमुळे गॅसचे झपाट्याने 'बुकिंग'! एका दिवसात तब्बल 'इतक्या' सिलिंडरचे वितरण; किती साठा आहे शिल्लक? वाचा..

Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

Kanagi: ‘गोंयकार’ गृहिणी तव्यावर लोणी सोडून मग डोळे बंद करून भाजीच्या टोपलीत हात घालतात; 'कणगी'महात्म्य

SCROLL FOR NEXT