Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

Drug Case: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ३.१६ कोटी रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ३.१६ कोटी रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका विदेशी पर्यटकाला अटक करण्यात आली आहे. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ७ जानेवारी रोजी ही कारवाई केली.

बँकॉकहून ताश्कंदमार्गे मोपा विमानतळावर उतरलेल्या एका संशयित प्रवाशाला अधिकाऱ्यांनी अडविले. त्याच्या साहित्याची झडती घेतली असता, कपड्यांच्या खाली अतिशय शिताफीने लपवून ठेवलेला ९.०३६ किलो वजनाचा ‘हायड्रोपोनिक वीड’ हा उच्च दर्जाचा गांजासदृश अमली पदार्थ सापडला.

Goa Drug Case
Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

जप्त केलेला घटक हा अमली पदार्थ असल्याचे क्षेत्रिय चाचणी संचाद्वारे स्पष्ट झाले. त्यानंतर अमली पदार्थ आणि मनोविकार द्रव्ये कायदा, १९८५ च्या कलमाखाली प्रवाशाला तत्काळ अटक केली.

Goa Drug Case
Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

‘नशामुक्त भारत’ हे राष्ट्रीय स्वप्न साकार करण्यासाठी गोवा सीमा शुल्क विभाग कटिबद्ध आहे. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जात असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सीमा शुल्क आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com