Old Goa Gramsabha  Dainik Gomantak
गोवा

Old Goa: जुने गोवेत ‘इको पर्यटन’ नकोच! ग्रामसभेत ठराव संमत; ‘वारसा’ स्मारकाचे पावित्र जपण्‍याची मागणी

सुमारे 25 जणांनी प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेत तक्रार सादर केली

गोमन्तक डिजिटल टीम

Old Goa Gramsabha जुने गोवा येथील प्रस्तावित इको पर्यटन प्रकल्पाला जुने गावेवासीयांनी तीव्र विरोध केला आहे. अवर लेडी ऑफ मोंत चॅपल येथील परिसरात गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. प्रकल्पाविरोधात आज ग्रामसभेत ठराव मांडून एकमताने संमत करण्यात आला.

सुमारे 25 जणांनी प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेत तक्रार सादर केली. प्रकल्प आल्यास अवर लेडी ऑफ मोंत चॅपल येथील पावित्र्य आणि नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल. मोंत चॅपल हे वारसा स्मारक असल्याने येथे बफर झोन आहे, त्याचे उल्लंघन होणार आहे.

तसेच विकास प्रतिबंधित क्षेत्र असल्याने देखील कायद्याची पायमल्ली होईल. तेव्हा वारसा स्मारकांचे पावित्र जपावे, अशी मागणी ग्रामस्थातर्फे ग्लेन काब्राल यांनी केली.

जुने गोवेचे सरपंच विश्वास कुट्टीकर म्हणाले, आयपीबीने प्रकल्प मंजूर केल्याने यासंदर्भात सूचना देण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपते. प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी अगोदर आयपीबीमध्ये गेले होतो, त्यांनी खाण खात्यात जाण्याची सूचना दिली.

तेथे देखील प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. त्यासाठी आम्ही 5 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करणार आहोत. तसेच हा प्रकल्प जरी चांगला असला तरी जुने गोवेत नको, अशी आमची मागणी आहे.

ग्रामसभेत जुने गोवे येथील वारसा स्मारकाच्या जागेत प्रादेशिक आराखडा 2021 अनुसार बफर झोन निश्चित करणारा मास्टर प्लान तयार करण्याचा ठराव संमत करण्यात आला. जुने गोवे येथील स्मारकांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असून त्यांचे संरक्षण गरजेचे आहे.

सद्यःस्थिती पाहिल्यास स्मारकांचे संरक्षण होत नाही, त्यासाठी हा मास्टर प्लॅन अनिवार्य आहे, असे ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली.

...पोलिसांत तक्रार!

ग्रामसभेत जुने गोवे येथील वारसा स्थळाच्या जवळच्या बेकायदा बंगल्याच्या बांधकामासाठी घेतलेले परवाने हे फसवणूक करून घेतल्याची तक्रार सध्या जुने गोवे पोलिसात केली गेली आहे. याची दखल घेत पंचायत मंडळानेही पोलिसात पुन्हा तक्रार करण्याची मागणी ग्लेन काब्राल यांनी केली. परंतु ग्रामसभेच्या नियमांनुसार पंचायत मंडळाला ते शक्य नसल्याचे उत्तर पंचायत सचिवांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT