Ration Shops | One Nation, One Ration Card in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Government: कोठेही राहत असला तरी मिळेल रेशन, 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड'ला चालना देण्यासाठी गोवा सरकार सरसावले

One Nation, One Ration Card in Goa: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.

Pramod Yadav

One Nation One Ration Card In Goa: गोवा सरकारने 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' उपक्रमाला चालना देण्यासाठी राज्यात त्याला प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले आहे.

पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. पात्र शिधापत्रिकाधारक देशात कुठेही असो, त्यांना कुठूनही हक्काच्या अन्न सुरक्षा तरतुदींनुसार रेशन मिळण्याची सुविधा आहे.

यामुळे लाभार्थ्यांना सहज पद्धतीने देशात कुठेही सुविधा मिळणार आहे, 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' शिधापत्रिकेवर नमूद केलेल्या स्थळ विचारत न घेता रास्त भाव दुकानातून रेशन घेण्याची परवानगी देते.

दरम्यान, शिधापत्रिकांसाठी एकसंध प्रणाली उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असताना, राज्यातील अनेक लाभार्थी केवळ नेमून दिलेल्या ठिकाणांहूनच रेशन गोळा करत आहेत.

त्यामुळे नागरी पुरवठा विभाग सरकारच्या नवीन प्रणालीच्या फायद्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जागरूकता मोहीम सुरू करत आहे.

"नवीन प्रणालीच्या अंतर्गत पणजीत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तिसवाडी तालुक्यातील रास्त भाव दुकानातून रेशन घ्यायचे असल्यास, त्यांच्या कुटुंबाचे रेशनकार्ड पेरनेममध्ये नोंदणीकृत असूनही, तो रेशन घेऊ शकतो," असे विभागाच्या एका अधिकाऱ्याने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT