Teaching Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आता दर्जेदार अध्यापनाला चालना देण्यासाठी महाविद्यालयांसाठी आर्थिक योजना

गोव्यात आता दर्जेदार अध्यापनाला चालना देण्यासाठी महाविद्यालयांना आर्थिक सहकार्य दिले जात आहे.

Pramod Yadav

गोव्यात आता दर्जेदार अध्यापनाला चालना देण्यासाठी महाविद्यालयांना आर्थिक सहकार्य दिले जात आहे. सरकारी आणि सरकारी अनुदानित महाविद्यालयांचे NIRF रँकिंग आणि NAAC ग्रेड सुधारण्याच्या उद्देशाने अंतर्गत गुणवत्ता मूल्यांकन प्रणालीच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.

फॅक्लटी विकास कार्यक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी आणि अल्पकालीन गुणवत्ता सुधारणा अभ्यासक्रमासाठी राज्याने शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे.

उच्च-गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला असून, 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल.

शिक्षक आणि संशोधकांना त्यांच्या संशोधन, ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच प्रदान करण्यासह सुविधांचा विस्तार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे उच्च शिक्षण अप्पर सचिव एवेलिना डी'सा ई परेरा यांनी म्हटले आहे.

कार्यक्रम प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, शिकवण्याच्या प्रक्रिया, शिकणे आणि मूल्यमापनाचा गाभा विकसित करण्यास मदत करेल, असेही परेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT