Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: आमदार विकत घेण्यासाठी आलेला खर्च सरकार पाणी बिलातून उकळतय

पाणी बिलावरुन सरदेसाई यांचे सरकारवर टीकास्त्र

दैनिक गोमन्तक

गोवा सरकारने आज गांधी जयंती दिवशी महत्वाचा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार एक ऑक्टोबर पासून राज्यात पाणी बिलामध्ये पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या पाणी बिलात ही वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यावरुन गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.

(goa govt hikes water tariff Mla Vijai Sardesai Criticized goa government)

राज्य सरकार आमदार विकत घेण्यासाठीचा पैसा वाढ केलेल्या पाणी बिलातून उकळतय, असा आरोप त्यांनी यावेळी केला. विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप आणि प्रमोद सावंत ( CM Pramod Sawant) यांनी गोव्यातील जनतेला प्रत्येक घरात 16 हजार लिटर पाणी मोफत मिळेल असे सांगितले होते. याचा उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यात देखील करण्यात आला आहे.

भाजप (BJP) सरकार स्थापन झाल्यानंतर सहाच महिन्यात याच सरकारने आपल्या वचनावर पलटी मारली आहे. आणि पाणी बिलात वाढ केली आहे. भाजपला मत दिले म्हणून सरकार पाणी बिल वाढ करून त्यांना दंड करत आहे. अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली

आमदारांना विकत घेण्यासाठी आलेला खर्च सरकार गरीब जनतेकडून वसूल करत आहे का? प्रश्न देखील गोमंतकीयांना पडला आहे. त्यामुळे गोव्याच्या जनतेला माझी विनंती आहे की जागे व्हा. दिवसेंदिवस भाजप सरकार तुम्हाला कसे फसवत आहे. याची जाणीव लोकांना व्हायला पाहीजे असेही विजय सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT