Goa Water Tariff Hike Dainik Gomantak
गोवा

Goa Water Tariff Hike: गोयंकार पाणी बिल महागले! सर्व प्रकारच्या पाणी बिलात 5 टक्के वाढ

आता प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरवातीला होणार पाणी बिलात वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Water Tariff Hike: गोवा सरकारने गांधी जंयती दिवशी महत्वाचा निर्णय घेतला आहे. एक ऑक्टोबर पासून राज्यात पाच टक्के पाणी बिलात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व प्रकारच्या पाणी बिलात ही वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच, यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला पाणी बिलात वाढ होणार आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांच्या खिशाला वाढीव बिलाची झळ बसणार आहे.

सरकारच्या पाणी बिल वाढीच्या निर्णयावर आता विविध प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत

विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप आणि प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्यातील जनतेला प्रत्येक घरात 16 हजार लिटर पाणी मोफत मिळेल असे सांगितले होते. याचा उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यात देखील करण्यात आला आहे. भाजप (BJP) सरकार स्थापन झाल्यानंतर सहाच महिन्यात याच सरकारने आपल्या वचनावर पलटी मारली आहे. आणि पाणी बिलात वाढ केली आहे. भाजपला मते केले म्हणून पाणी बिल वाढ करून त्यांना दंड केला आहे. अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

आमदारांना विकत घेण्यासाठी आलेला खर्च सरकार गरिब जनतेकडून वसूल करत आहे का प्रश्न देखील गोमंतकीयांना पडला आहे. त्यामुळे गोव्याच्या जनतेला माझी विनंती आहे की जागे व्हा. दिवसेंदिवस भाजप सरकार तुम्हाला कसे फसवत आहे. याची जाणीव लोकांना व्हायला पाहीजे असेही विजय सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT