Goa Mining Issue : 'खाणी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून फक्त तारखांचीच घोषणा'

विजयची टीका; विधानसभेतही सावंत खोटे बोलल्याचे सिद्ध
Vijai Sardesai slams goa government on mining issue
Vijai Sardesai slams goa government on mining issue Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : खाणी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता नोव्हेंबर 2223 ही नवीन तारीख जाहीर केल्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी त्यांच्यावर टिका करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना खाणी सूरू करण्याऐवजी फक्त तारखा जाहीर करण्यातच अधीक स्वारस्य असल्याचे म्हटले आहे.

Vijai Sardesai slams goa government on mining issue
Margao Municipal Council : मडगावचा मुख्याधिकारी पुन्हा बदलला; मान्युएल बार्रेटोंची नियुक्ती

विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप सरकार सत्तेवर आल्यास अवघ्या सहा महिन्यांत आम्ही दुहेरी वेगाने गोव्यात मायनिंग सुरू करू असे हे सरकार म्हणत होते. हा मुद्दा विधानसभेत चर्चेस आला त्यावेळी मी येत्या पावसापर्यंत या सरकारकडे गोव्यात खाणी सुरू करणे शक्य नाही असे मी म्हटले होते.

माझे म्हणणे खरे होते हे आता सावंत यांनी जाहीर केलेल्या नवीन तारखेवरून सिद्ध झाले आहे. सहा महिन्यात खाणी सुरू करू असे विधानसभेला आश्वासन देऊन मुख्यमंत्री चक्क विधानसभेतच खोटे बोलले असा आरोप सरदेसाई यांनी केला.

जुवारी पुल असो, मोपा विमानतळ असो किंवा खाणी असोत, या मुख्यमंत्र्यांना फक्त तारखा जाहीर करणेच येते. त्या तारखेप्रमाणे काम पूर्ण करता कधीच येत नाही असा आरोप त्यांनी केला.

राज्यात सरकारने पाणी पट्टीत वाढ केली आहे. त्यावर टीका करताना,जे सरकार आधी लोकांना 16 हजार लीटर पाणी फुकट देण्याची बात करत होते तेच सरकार आपले आधीचे आश्वासन पूर्ण न करता आता पाणीपट्टी वाढवत आहे.

काँग्रेसचे आठ आमदार फोडण्यासाठी जे सरकारने पैसे खर्च केले ते आता असे लोकांकडून वसूल करत आहे का असा प्रश्न सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com