Margao Municipal Council : मडगावचा मुख्याधिकारी पुन्हा बदलला; मान्युएल बार्रेटोंची नियुक्ती

रोहित कदम यांची बदली
 Margao Municipal Council
Margao Municipal CouncilDainik Gomantak 
Published on
Updated on

फातोर्डा : मडगाव नगरपालिकेत नवीन मुख्याधिकारी म्हणून मान्युएल बार्रेटो यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी या पदावर असलेले रोहित कदम यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सध्या नगरपालिकेत नगराध्यपदाची खुर्ची खाली असून आता मुख्याधिकारीही नसल्याने मडगाव नगरपालिकेत येणाऱ्या लोकांची कामे खोळंबून पडणार आहेत.

 Margao Municipal Council
‘FIFA World Cup स्पर्धेचे ‘पास’ महिला क्रीडाप्रेमींना मोफत द्या’: मारियान रॉड्रिग्ज

यापूर्वी असलेले मडगाव नगरपालिकेचे रोहित कदम यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे, तर त्या पदावर कार्यरत असलेले मान्युएल बार्रेटो यांना मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदावर पाठविण्यात आले आहे, असा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

रोहित कदम यांची मुख्याधिकारीपदावर नेमणूक या वर्षाच्या मे महिन्यात करण्यात आली होती. केवळ पाच महिने त्यांनी या पदावर काम केले आहे. मागील काही वर्षांपासून मडगाव नगरपालिकेत स्थिर मुख्याधिकारी अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. कदम यांच्यापूर्वी असलेले आग्नेल फर्नांडिस यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदावर 19 महिने काम केले आहे. नंतर त्यांचीही बदली करण्यात आली होती.

दोन वर्षांत चार मुख्याधिकारी

मडगाव नगरपालिकेत दोन वर्षांच्या कार्यकाळात एकूण चार मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करून नंतर बदली करण्यात आली आहे. याबरोबरच गेल्या महिन्यात नगराध्यक्षपदावर विराजमान झालेल्या घनश्याम शिरोडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनपर्यंत नव्या नगराध्यक्षाची निवड करण्यात आली नाही.

याला आता 10 दिवस लोटले आहेत. अजूनही नव्या नगराध्यक्षपदाची नेमणूक झाली नसल्याने आणि मान्युएल बार्रेटो यांनीही आपल्या पदाचा ताबा घेतला नसल्याने काही दिवसासाठी मडगाव नगरपालिकेतील लोकांची कामे खोळंबून पडण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com