Goa Governor Exclusive Interview Dainik Gomantak
गोवा

PS Sreedharan Pillai: विचार शुद्ध असतील, तर विरोधकांशीही जुळतात सूर : राज्यपाल

राजकारणात तत्त्वांवर भर देणे गरजेचे

दैनिक गोमन्तक

Goa Governor Exclusive Interview: लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक असतात. विचारांत भिन्नता असते, त्यावरून मतभेद असतात. पण ते शत्रू नसतात आणि नसावेतही. विचारांची शुद्धता ठेवत राजकारण केले तर विरोधकांशीही असलेले बंध दृढ होतात, असे निरीक्षण राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांना दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी व्यक्त केले.

ते म्हणाले की, केरळमध्ये भाजपचा पदाधिकारी असताना अनेक महत्त्वाच्या खटल्यांत भिन्न विचारसरणीच्या राज्यकर्त्यांनी माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती ती अशाच बंधातून.

केरळमधील डावे असोत किंवा कॉंग्रेसवाले. त्यांच्या मनात माझ्या प्रति प्रेम आणि सन्मान आहे. २ महिन्यांपूर्वी माझ्या एका कवितासंग्रहाचे प्रकाशन केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केले. विचारसरणीच्या अनुषंगाने आमच्यात दोन वेगळ्या रेषा आहेत. त्या कधीही एकत्र येऊ शकत नाहीत.

परंतु केरळच्या कॉंग्रेस समितीने माझ्याकडे एका पुस्तकाची मागणी करून त्याचे त्यांनी प्रकाशनही केले. राजकारणात प्रत्येकाच्या आकांक्षा असणे साहजिकच आहे. त्यामुळे काही चुका होतात. त्यामुळे राजकारणात तत्त्वांवर अधिक भर देणे गरजेचे आहे.

ते म्हणाले की, महात्मा गांधी यांच्याकडून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक तत्त्व आणि दुसरे धोरण. प्रत्येक राजकीय पक्षाला तत्त्व आणि धोरणे असतात. धोरण काळानुसार बदलू शकते; परंतु तत्त्व बदलत नाही. महात्मा गांधीजींनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही.

स्वराज्य आणि सुराज्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यामुळे सर्व राष्ट्रीय नेत्यांना मी मानणाऱ्यांपैकी आहे, मग ते महात्मा गांधी असोत, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, लालबहाद्दूर शास्त्री किंवा राममनोहर लोहिया.

अन्य धर्मियांनाही आधार

राज्यपाल होण्यापूर्वीपासून माझे ख्रिस्ती नेत्यांशी आपुलकीचे संबंध आहेत. ते मला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये निमंत्रित करतात. ख्रिस्ती तत्त्वांप्रमाणेच गोव्याचे राज्यपाल जीवन व्यतीत करतात, असे उद्गार ख्रिस्ती नेत्यांनी काढले.

ज्यावेळी मी मिझोराममध्ये राज्यपाल म्हणून गेलो तेव्हा हिंदु विचारसरणीचे राज्यपाल आम्हाला नकोत यासाठी तेथील विरोधक आंदोलन करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होता. हे माझ्यासाठी अनपेक्षित होते.

प्रेम करा, प्रेम मिळेल

मिझोरामची लोकसंख्या १५ लाख असून तेथे ८८ टक्के ख्रिस्ती, ९ टक्के बुद्ध, २ टक्के हिंदू, १ टक्का मुस्लिम आहेत. माझ्याबाबत विरोधकांचे विचार काही काळाने बदलले. सहा महिन्यांनंतर विरोधी पक्षनेते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले.

ज्यावेळी ते तळ्यातून मासे पकडायचे, त्यावेळी ते माझ्यासाठी राजभवनवर मासे पाठवायचे. जर तुम्ही इतरांना प्रेम दिले तर तुम्हालाही प्रेम मिळते, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT