Goa Governor
Goa Governor Dainik Gomantak
गोवा

Goa Governor: गोव्यात 31 झाडांना वारसा दर्जा

Sumit Tambekar

केपे: राज्याची संस्कृती आणि पर्यावरण यांची राखण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे सांगून गोव्यात 31 वारसा महत्व असलेली झाडे सूचित केली असून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई यांनी केली.

(Goa Governor P. S. Sreedharan Pillai informed that he will visit all the villages till November 15)

देशाच्या विकासासाठी ग्रामस्वराज्य हाच एकमेव उपाय आहे. भारताची राज्यघटना ही महासागर आहे. भारतीय संविधानानुसार जनता सर्वोच्च आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी, नोकरशहा आणि सरकारशी संबंधित प्रत्येक व्यक्ती जात, पंथ, धर्म आणि इतर भेदांची पर्वा न करता लोकांची सेवा करण्यास बांधील आहे.

आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत असे राज्यपाल पिल्लई यांनी म्हटले आहे. कुडचडे मतदारसंघातील शेल्डे आणि असोल्डा गावातील पंचायतींच्या सरपंच आणि पंच सदस्यांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आज म्युनिसिपल हॉल, कुडचडे येथे राजभवन विवेकाधीन निधी अंतर्गत 4 डायलिसिस आणि 10 कर्करोग अशा 14 रुग्णांना प्रत्येकी 25,000 रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप केले.

केरळप्रमाणेच गोवाही देवांचा देश आहे

गोव्याचा दिवसेंदिवस विकास होत आहे. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सर्व गावांचा दौरा पूर्ण होईल. अठराव्या शतकात जगाने स्वीकारलेल्या स्वामी विवेकानंदांनी गोव्याला भेट दिली आणि त्यांना प्रेरणा मिळाली. आपण गोव्याची संस्कृती, परंपरा, इतिहास आणि इतर सर्व चांगल्या गोष्टींचा बाहेरच्या जगापर्यंत प्रचार केला पाहिजे. केरळप्रमाणेच गोवाही देवांचा देश आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री, नीलेश काब्राल म्हणाले की, राज्यपालांचे कुडचडे मतदारसंघात स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. या मतदारसंघातील संपूर्ण लोकसंख्या खाणकामावर अवलंबून आहे, आणि खाण उद्योग बंद पडल्यामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. लवकरच खाणकाम पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे.

सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करू शकलेले पहिले राज्यपाल

आगामी काळात मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्ण होतील. अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट यांचा त्यात समावेश आहे. सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करू शकलेले पहिले राज्यपाल अशा शब्दात राज्यपालांचा गौरव केला.

यावेळी असोल्डा पंच सदस्य श्री.मनोज नाईक यांची भाषणे झाली. कुडचडेच्या नगराध्यक्षा डॉ.जस्मिन ब्रागांझा यांनी स्वागत केले. जि.प. सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी आभार मानले. श्री वसंत सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT