Land Grabbing Case: एक सदस्यीय आयोग गोव्यात दाखल

'त्या' एफआयआरची करणार चौकशी
Goa Land Grabbing Case
Goa Land Grabbing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

जमीन हडपप्रकरणाच्‍या तक्रारीने राज्यात मोठे वादंग उठले होते. या प्रकरणावरुन राजकिय नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी ही झडल्या आहेत. यामध्ये सुमारे 200 च्यावर तक्रारी दाखल झाल्या आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय आयोग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(One-man commission on land grabbing arrives in Goa)

Goa Land Grabbing Case
Goa Mining: मायनिंग ब्लॉक्सच्या लिलावात कमालीची गुप्तता; चार ब्लॉक्ससाठी 24 कंपन्या शर्यतीत?

मिळालेल्या माहितीनुसार एक सदस्यीय आयोग म्हणून नियुक्ती करण्यात आलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव या प्रकरणावरुन नुकतेच ते गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्यात दाखल होत ते राज्यात झालेल्या विविध तक्रारी, बेकायदेशीर जमीन हस्तांतरण आणि बनावट कागदपत्रांद्वारे जमीन बळकावणे यासंबंधीच्या एफआयआरची चौकशी करणार असून हा एक सदस्यीय आयोग याबाबतचा आपला अहवाल राज्यशासनाला सादर करणार आहे.

Goa Land Grabbing Case
Mapusa Municipal Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; म्हापसा पालिकेकडून तिघांना नोटीस

बार्देश तालुक्यातील जमिन घोटाळ्यातील 20 पेक्षा जास्त तक्रारी नोंद

मुरगाव तालुक्यातील 2 व 3 संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांच्यावर बार्देश तालुक्यातील जमिन घोटाळ्यातील 20 पेक्षा जास्त तक्रारी म्हापसा पोलिसात नोंद झाल्या आहेत. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जमिन घोटाळ्याचे तपासकार्य पणजी येथील विशेष तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com