Goa governor P. S. Sreedharan Pillai announce financial help to student hostels  Dainik Gomantak
गोवा

काणकोणातील तीन वसतिगृहांना राज्यपालांचे अर्थसाहाय्‍य

राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी काणकोणमधील तीन वसतिगृहांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

दैनिक गोमन्तक

देशाचा प्राण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात वसतो आहे. त्यामुळेच राजभवनातील पंचतारांकित जीवन जगण्यापेक्षा ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधण्यास आपल्‍याला जास्त स्वारस्य असल्याचे प्रतिपादन राज्यपाल श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांनी केले. समाजातील सोयी-सुविधांना मुकलेल्या समाज घटकांना आधार देण्याचे ठरविल्‍याचे राज्‍यपालांनी काणकोण दौऱ्यावेळी जनतेशी संवाद साधताना सांगितले.(Goa governor P. S. Sreedharan Pillai announce financial help to student hostels)

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्‍या पत्नी रिता श्रीधरन पिल्लई, उपसभापती इजिदोर फर्नांडिस हे उपस्थित होते. तसेच राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई, सेवा संकल्प संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनिता तिळवे, सचिव सदानंद आमोणकर, ज्‍येष्ठ सदस्य बाबू कोमरपंत, आनंदू म्हाळशी, लक्ष्मण वेळीप, डॉ. विलास पावस्कर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. तिळवे यांनी भविष्यकाळात वसतिगृहात व्यावसायिक शिक्षण देण्याची सोय करण्यात येणार आहे. त्या योजनेलाही राजभवनकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली व संस्थेचा अहवाल सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कामत यांनी केले. यावेळी लोलयेचे ग्रामदैवत समितीचे अध्यक्ष भूषण प्रभुगावकर यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी राज्यपालांच्या संमतीने लोलये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घेऊन एक दिवस राजभवनावर येण्याचा मनोदय व्यक्त केला.

दरम्यान राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी काणकोणमधील तीन वसतिगृहांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. या दौऱ्यात त्यांनी तेंबेवाडा-चाररस्ता येथे केशव सेवा साधना संचलित माताजी मंदिर विद्यार्थी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी पैंगीण येथील श्री परशुराम वसतिगृह, लोलये येथे सेवा संकल्प संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या कन्या वसतिगृहाला त्यांनी आर्थिक मदत दिली. कल्याण आश्रमालाही आर्थिक मदत दिली. यावेळी माताजी मंदिर वसतिगृहाचे अध्यक्ष नवनाथ सावंत, व्यवस्थापक ॲड. खगेंद्र हेगडे देसाई हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT