पाटणेत ‘ओबीसी’ महामेळावा,5 डिसेंबरला आयोजन

गोव्यातील इतिहासात प्रथमच काणकोण तालुक्यात ‘ओबीसी’ समाजातील 19 जाती एकत्र येणार आहेत.
OBC gathering on 5th December in Canacona
OBC gathering on 5th December in Canacona Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण (Canacona) तालुक्‍यात अखिल भारतीय ओबीसी महासभेतर्फे (OBC gathering) 5 डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. हा महामेळावा पाटणे येथील श्री देवगीपुरूष देवस्थान सभागृहात होणार असल्‍याचे ओबीसी (obc) महासभेचे गोवा अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी जाहीर केले आहे.गोव्यातील इतिहासात प्रथमच काणकोण तालुक्यात ‘ओबीसी’ समाजातील 19 जाती एकत्र येणार आहेत. त्यामध्ये पागी, भंडारी, च्यारी, कोमरपंत, सतरकर, गाबीत, ख्रिश्चन रेंदेर, नाभिक, मडवळ, गोसावी, कुंभार आणि ख्रिश्चन कुंभार यांचा समावेश आहे. ‘ओबीसी’ समजाला ताठ मानेने जगता यावे, हा महामेळाव्‍या मागचा हेतू आहे.

सुसंस्कृत असलेल्या या समाजाने गोमंतकात पिढीजात असलेली संस्कृती टिकवून हा वारसा युवा पिढीला हस्तांतरीत करावा, या हेतूने ज्ञातीबांधवाचे विचार व पुढील वाटचाल यावर या मेळव्यात चर्चा करण्यात येईल.(OBC gathering on 5th December in Canacona)

तालुका कार्यकारिणी निवड

काणकोण तालुका ओबीसी संघटना अध्यक्ष म्हणून मंगेश तुको पागी यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी सोयरू मधुकर कोमरपंत, मेळावा सल्लागार म्हणून डॉ. पूर्णानंद च्‍यारी, समन्वय समिती अध्यक्षपदी पंकज नमशीकर, स्वागताध्यक्षपदी काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो असतील. तसेच गोवा उपाध्यक्ष शंभू कुशाली नाईक, राज्य युवा अध्यक्षपदी सुनय सुभाष कोमरपंत, तर काणकोण उपाध्यक्षपदासाठी अशोक आपा धुरी, लोलयेचे सरपंच सचिन नाईक, सिद्धार्थ च्‍यारी, रघुवीर कोमरपंत, राजेंद्र गोसावी, तुळशीदास ठक्कर, नरेश नाईक. महासचिव म्हणून दत्ता वसंत कोमरपंत, सचिव अरूण घाणेकर यांची निवड करण्यात आली आहे.

5 डिसेंबर रोजी मेळाव्यात ‘ओबीसी’ समाजासाठी काम केलेल्या 26 मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. या मेळाव्यात ‘ओबीसी’ बांधवांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वाजता मशाल मिरवणुकीने मेळाव्याची सुरवात होणार आहे. यावेळी काणकोण व संपूर्ण गोव्यातील ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत.

‘ओबीसी’ समाजातील महिलांच्या समस्या चर्चासत्रात समावेश केला आहे. काणकोण तालुक्यात स्वतंत्र ‘ओबीसी’ भवनाची निर्मिती करावी.

राज्य सरकारमध्ये स्वतंत्र ‘ओबीसी’ मंत्री व मंत्रालयाची निर्मिती करावी. शिक्षण क्षेत्रात व समाजातील अन्य घटकासाठी समाजकल्याण खात्यातर्फे आर्थिक मदत सुलभरितीने उपलब्ध करण्यासाठी मागणी करण्यात येईल. ​राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या समस्यांकडे सरकारने त्वरित लक्ष घालावे, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com