Goa Governor P S Sredharan Pillai  Dainik Gomantak
गोवा

Goa Governor Pillai: तिरूअनंतपुरम प्रेस क्लबतर्फे गोव्याच्या राज्यपालांचा सत्कार, साहित्यसेवेला 50 वर्षे पूर्ण...

दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्या हस्ते झाला गौरव

Akshay Nirmale

Goa Governor P. S. Sreedharan Pillai: गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्या हस्ते पिल्लई यांना गौरविण्यात आले.

साहित्य सेवेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पिल्लई यांचे गृहराज्य असलेल्या केरळची राजधानी तिरूअनंतपुरम येथे हा सत्कार करण्यात आला. पिल्लई यांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तिरूअनंतपुरम प्रेस क्लबतर्फे हा कार्यक्रम झाला.

राज्यपाल पिल्लई म्हणाले की, आयुष्यातील सुरुवातीची परिस्थिती आणि सार्वजनिक जीवनातून मिळालेले अनुभव, लोकसंपर्क यातून लेखक झालो. मनुष्याच्या भावना मनु्ष्याच्या जीवनावर वरचढ होता कामा नयेत. लोकशाहीचे सौंदर्य हे आपल्या विविधतेत आहे. देशाच्या हिताचे रक्षण करणे नागरिकांचे कर्तव्य आहे.

अदूर गोपालकृष्णन म्हणाले की, पिल्लई यांनी कविता, प्रवासवर्णने आणि राजकीय भाष्य याबाबत 200 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. साहित्य आणि संस्कृतीकडे झुकणारे पिल्लई यांच्यासारखे राजकारणी लोकांना चांगले समजून घेऊ शकतात. त्यामुळे ते चांगले नेते बनतील.

प्रेस क्लब अंतर्गत पत्रकारिता संस्थेच्या पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमाचे पिल्लई यांच्या हस्ते उद्घाटन यावेळी झाले. कार्यक्रमाला मल्याळम मनोरमाचे माजी संपादकीय संचालक थॉमस जेकब, प्रेस क्लबचे अध्यक्ष एम. राधाकृष्णन आणि संचालक सिबी कट्टमपल्ली उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT