Goa Governor P S Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

‘स्वयंपूर्ण गोवा’ द्वारे राज्यपालांचा जनतेला दिलासा

दैनिक गोमन्तक

पणजी : कोविड काळात सरकारने विकास तसेच महसुलाच्या बाबतीत दर्जेदार कामगिरी केली आहे. ड्रग्जमुक्त राज्य करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर राज्य सरकारने स्वयंपूर्ण गोवा उपक्रम सुरू करून जनतेला दिलासा दिला आहे. राज्यातील रोजगारनिर्मिती तसेच बंद झालेला खाण व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पुढील 25 वर्षांसाठीचा पथदर्शी आराखडा तयार करण्याचे आवाहन राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांनी आज आठव्या विधानसभा अधिवेशनाच्या अभिभाषणावेळी केले. (Goa Governor P S Sreedharan Pillai News Updates)

देशात तसेच राज्यात कोव्हिड महामारीच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडलेली असतानाही सरकारने (Goa Government) चौफेर विकासकामे तसेच महसूल मिळवण्यासाठी प्रयत्न केले. महसूल प्राप्तीवर भर देत गोव्याच्या माध्यमातून जनतेचा विकास साधण्यावर, कोविड जागृती यावर अधिक भर देण्यात आला. देशात 100 टक्के कोरोना लसीकरण डोस पूर्ण झाले त्यामध्ये गोव्याचाही (Goa) समावेश आहे ही स्तुत्य बाब आहे, असे राज्यपाल म्हणाले. यावेळी त्यांनी अभिभाषणात सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबाबत राज्यपाल श्रीधरन यांनी स्तुती केली. या काळात सरकारने दर्जात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण क्षेत्रावर अधिक भर देताना त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले, असेही ते म्हणाले

कोरोना महामारीला नियंत्रणात ठेवण्यात सरकारने कोणतीही कसूर सोडली नाही. 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. अपघातमुक्त क्षेत्र करण्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यपालांनी (Governor) केलेल्या अभिभाषणामध्ये वैद्यकीय क्षेत्रात तसेच गोमेकॉ इस्पितळात उपलब्ध करण्यात आलेली अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणा, सुरु करण्यात आलेले नवे अभ्यासक्रम आणि वाढवण्यात आलेल्या जागा, अर्ध्यावर शाळा सोडणाऱ्या मुलांना शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी सुरु केलेली माध्यान्ह आहार योजना, कौशल्य शिक्षण दिले जात आहे, असे सांगितले. सरकारने 28 विविध साधनसुविधा विकासकामे पूर्ण केल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT