Goa Mineral Fund Dainik Gomantak
गोवा

Goa Mineral Fund: राज्याच्या विकासाला मिळणार 'बुस्टर डोस'; सरकारला वापरता येणार संपूर्ण खाण निधी

यापुर्वी केवळ 50 टक्के निधी वापरण्यास होती परवानगी

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Mineral Fund: खाण पट्ट्यातील विकास कामांसाठी गोवा डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन ट्रस्ट (GDMFT) निधीतील सर्व निधी वापरण्यास परवानगी राज्य सरकारला दिली जाणार आहे. गुरूवारी याबाबत निर्णय झाला.

पुर्वी या निधीतील केवळ 50 टक्के निधी विकासकामांसाठी वापरण्यास परवानगी होती. या निधीमध्ये 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे.

जिल्हा खाण निधीच्या नियमांनुसार 50 टक्के निधी मुदत ठेवींमध्ये (FDs) बाजूला ठेवला जातो. शिल्लक 50 टक्के पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण उपाय, आरोग्यसेवा, शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, वृद्ध आणि अपंग लोकांचे कल्याण, पायाभूत सुविधा, सिंचन, ऊर्जा आणि पाणलोट विकास, कौशल्य विकास आणि स्वच्छता आणि भौतिक सुविधा यासारख्या घटकांसाठी उपलब्ध आहे.

अतिरिक्त 50 टक्के निधी अनलॉक करण्यासाठी, सरकारने GDMFT कायद्यात सुधारणा केली आहे. त्यानुसार संपूर्ण रक्कम, त्यावरील व्याजासह वापरता येईल. दक्षिण आणि उत्तर जिल्हा मायनिंग फंडमध्ये सुमारे 200 कोटी रूपयांचा निधी विनावापर पडून आहे. हा निधी विविध विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

SCROLL FOR NEXT