Goa government water bill relief Dainik Gomantak
गोवा

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa government water bill relief: गणेश चतुर्थी समाप्‍तीच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍य सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. घरगुती जल ग्राहकांना आता १६ घनमीटर पाण्याचे किमान बिल भरावे लागणार नाही.

Sameer Amunekar

पणजी: गणेश चतुर्थी समाप्‍तीच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍य सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. घरगुती जल ग्राहकांना आता १६ घनमीटर पाण्याचे किमान बिल भरावे लागणार नाही.

या महिन्याच्या सुरुवातीपासून त्यांना केवळ मीटर भाडे व प्रत्यक्षात किती पाणी वापरले जाणार, तेवढेच बिल आकारले जाणार आहे. तसा आदेश पेयजल खात्याने जारी केला आहे.

एकाच मीटरवर दोनपेक्षा जास्त घरांना पाणीपुरवठा केला जात असल्यास पूर्वीप्रमाणेच १६ घनमीटर पाण्याचे किमान बिल व पाण्याच्या वापराप्रमाणेच बिल आकारले जाणार आहे.

पाण्याचा मीटर सुरू असल्यासच ही सवलत लागू होणार आहे. याआधी १६ हजार लीटर पाणी मोफत दिले जात असे. ती सवलत मे महिन्यामध्ये मागे घेण्यात आली.

त्यानंतर आता ही नवीन बिल आकारणी पद्धत या महिन्यात लागू केली आहे. १ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष वापरानुसार काटेकोरपणे बिल आकारले जाईल. अधिसूचनेनुसार हा लाभ फक्त कार्यरत पाणी मीटर असलेल्या घरांना लागू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Celebrates Diwali: भर समुद्रात देशभक्तीचा उत्‍साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी नौदलाच्‍या जवानांसमवेत

Goa Rain: पावसाचा धुमाकूळ, मयेतील शेती पाण्याखाली; बळीराजा अस्वस्थ, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती

Goa Crime: बेपत्ता सुरक्षा रक्षकाचा मृतदेह पिळगाव येथे नदीत आढळला, मृतदेह बाहेर काढण्यात डिचोली अग्निशमन दलाला यश

Cristiano Ronaldo: रोनाल्डो नाहीच, फुटबॉलप्रेमींचा हिरमोड; विश्रांतीसाठी सुपरस्टार खेळाडू रियाधमध्येच, तरीही सामन्याची तिकिटे संपली

Goa Politics: 'विरोधकांनी भ्रमात राहू नये', 'नरकासुर' संबोधल्यानंतर CM प्रमोद सावंतांचा जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT