Tiger Dainik Gomantak
गोवा

Tiger Track and Trace: राज्यातील वाघांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग होणार- वनमंत्री राणे

सुर्ली आणि मोलेम अभयारण्यातील (Surla and Mollem Wildlife Sanctury) पानस्थळी वनविभागाला कॅमेरे बसविण्यासाची सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यात वाघांचा अधिवास वाढला असल्याचे वेळोवेळी निर्दशनास आले आहे. अलिकडे वाघांचे दर्शन चारपटीने वाढले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यातील वाघांचा माघोवा घेऊन त्यांची नोंदणी (track and trace) करण्याची सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit rane) यांनी सोमवारी (दि.18) विधीमंडळात दिली.

याबाबत अधिक माहिती देताना राणे म्हणाले, 'सुर्ली आणि मोलेम अभयारण्यातील (Surla and Mollem Wildlife Sanctury) पानस्थळी वनविभागाला कॅमेरे बसविण्यासाची सूचना देण्यात आली आहे. वाघांची संबधित परिसरातील हलचाल देखील याच्यामदतीने ट्रॅक केली जाईल. वनसंरक्षण खात्याचे प्रमुख संतोष कुमार आत्तापर्यंत निर्दशनास आलेले वाघ तेच की वेगळे आहेत याबाबत खात्रीशीर माहिती देऊ शकत नाहीत. वाघांसाठी योग्य अधिवास निर्माण करण्यासाठी आम्ही साकारात्मक आहोत.'

राणे पुढे म्हणाले, 'राज्यात वाघांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने योग्य पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून वनविभागाने दोन तज्ञ सल्लागारांची निवड केली आहे. सध्या आढळून येणा-या वाघांबाबत निश्चित माहिती देता येणार नाही. पण, त्यांचा मागोवा घेतल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल. त्यासाठी वाघांना कॅमे-याच्या मदतीने ट्रॅक आणि ट्रेस केले जाईल.

केंद्राच्या इकोसेन्सेटिव्ह झोन बाबत देखील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला. 99 गावे या इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये येत असून त्या गावक-यांचे स्थलांतर त्यासाठी जमीन असे प्रश्न समोर असल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT