Chhatrapati Shivaji Maharaj 
गोवा

Betul Fort: छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण कार्य गोवा सरकार पूर्ण करणार; राज्यातील शिवरायांचा एकमेव किल्ला पुन्हा बांधणार

Shivaji Maharaj Fort In Goa: दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या किनारी बेतुल येथे किल्ला बांधण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते.

Pramod Yadav

मडगाव: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन गोव्यात उभारण्यात आलेला एकमेव बेतुल किल्ला पुन्हा बांधला जाणार आहे. अभिलेखागार आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या किल्ल्याचे बांधकाम अपूर्ण राहिले होते, अशी माहिती उपलब्ध आहे. हे काम आता गोवा सरकार पूर्ण करणार आहे.

बेतुल किल्ल्यावर ०६ जून रोजी शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला, यावेळी मंत्री फळदेसाई बोलत होते. “किल्ला पुन्हा बांधण्यासाठी वास्तुविशारद आणि सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत. कायदेशीरपणे ही जागा सरकारला ताब्यात घेता येणार नाही, यासाठी पर्यायी मार्गाचा विचार आम्ही केला आहे,” अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

किल्ला सीमाशुल्क विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतो, त्यामुळे याचे अधिकार केंद्राच्या कक्षेत येतात. किल्ल्याकडे जाणारा रस्ताही खासगी आहे, असे मंत्री फळदेसाई म्हणाले. ऐतिहासिक महत्व असलेल्या या किल्ल्याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. किल्ल्याची झालेल्या दुरावस्थेकडे इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींना वारंवार सरकारचे लक्ष वेधले आहे.

दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या किनारी बेतुल येथे किल्ला बांधण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते. बाळ्ळीचे हवालदार यांच्याकडे किल्ला बांधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पोर्तुगिजांमध्ये या किल्ल्याच्या उभारणीमुळे धास्ती निर्माण झाली होती. त्यांनी वेळोवेळी हे काम बंद देखील पाडले.

हवालदार या पोर्तुगीजांच्या धमकीला जुमानले नाहीत खरे पण, १६८० मध्ये शिवरायांच्या निधनानंतर या किल्ल्याचे बांधकाम काही प्रमाणात रखडले, असे इतिहासकार सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT