लग्नास नकार देणे, जीवन संपव म्हणणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही! न्यायालयाचे निरीक्षण; संशयिताची निर्दोष मुक्तता

Goa Court: विवाह करण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून म्हापसा येथील न्यायालयाने संशयित विठ्ठल गावकर याची निर्दोष मुक्तता केली.
High Court
CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विवाह करण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून म्हापसा येथील न्यायालयाने संशयित विठ्ठल गावकर याची निर्दोष मुक्तता केली. केवळ विवाह करण्यास नकार देणे हे आत्महत्येस प्रवृत्त करणे असे समजले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

संशयित विठ्ठल गावकर याचे आत्महत्या केलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने तिला विवाहाचे आश्‍वासन दिले होते. मात्र संशयिताला कायमस्वरूपी नोकरी नसल्याने तो विवाह करण्यास टाळत होता. मात्र प्रेयसीने त्याला विवाह करण्यास तगादा लावला होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात तिला आत्महत्या कर असे सुनावले होते.

त्यामुळे तिने अंगावर केरोसीन ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. होरपळल्याने तिला गंभीर जखमा झाल्या व गोमेकॉत उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. संशयिताने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला होता.

High Court
Goa Court Judgement: मागे बसलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू, कोर्टाने बाईक राईडरला ठरवले दोषी; काय दिली शिक्षा?

तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता तिने नकार दिला होता, त्यामुळे त्याने तिला मरहाणही केली होती. त्याने तिला तुला जे काही करायचे ते कर व आत्महत्या कर असे सुनावले होते असे तिने तिच्या मृत्युपूर्व जबानीत म्हटले होते. यासंदर्भात न्यायालयाने निरीक्षण केले की मृत्युपूर्व जबानीत संशयिताला दोषी धरले असले तरी त्यातून त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध होत नाहीत.

High Court
Kerala High Court: वडील मुस्लिम अन् आई हिंदू! पोरगा म्हणाला, मी इस्लाम मानत नाही; हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

बेरोजगार असल्याने त्याने विवाह करण्यास नकार दिला होता. चांगली नोकरी मिळेपर्यंत काही दिवस थांबण्यास सांगितले होते तरी तिने विवाहाचा आग्रह धरला होता. त्याने आत्महत्या कर असे म्हटले म्हणून तिने आत्महत्या केली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असे म्हणता येणार नाही. तिचे मन कमकुवत असल्याचे दिसून येते व तिला विवाह करण्याचा धीर नव्हता. तिने १८ वर्षे पूर्ण झाल्यावर संशयितांशी विवाहाचा आग्रह धरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com