Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

Savanar Maye house damage: पावसाच्या तडाख्यात सावनार-मये येथील वृद्धा सीताबाई मांद्रेकर यांच्या घरावर एकाचवेळी आंब्याचे मिळून दोन झाडे पडण्याची घटना घडली.
Savanar Maye tree fall
Savanar Maye tree fallDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पावसाच्या तडाख्यात सावनार-मये येथील वृद्धा सीताबाई मांद्रेकर यांच्या घरावर एकाचवेळी आंब्याचे मिळून दोन झाडे पडण्याची घटना घडली. झाडांच्या या पडझडीत घराच्या छपराची मोडतोड होऊन जवळपास दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. झाडे घरावर कोसळली, त्यावेळी मात्र घरात कोणीच नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला.

झाडे पडण्याची ही घटना रविवारी (ता.९) रात्री उशिरा घडली. झाडांच्या पडझडीत घरावरील पत्र्यांची मोडतोड झाली. तसेच भिंतींना काही प्रमाणात तडे गेले. या घरात सीताबाई मांद्रेकर या वृद्धा राहतात. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्या आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्या.

Savanar Maye tree fall
Goa traffic issue: राज्यात वाहतुकीचा मास्टर प्लॅन गरजेचा

डिचोली अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन घरावर पडलेली झाडे हटविली. दलाचे चालक ऑपरेटर संदीप परब यांच्यासह समीर शेट्ये, अमोल चोर्लेकर व एस. एल. माजिक या जवानांनी मदतकार्य केले.

Savanar Maye tree fall
Goa Dhiryo ban: धीरयोला बंदी, तरी झुंजी सुरूच! वार्का व बाणावलीत प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

आमदारांकडून पाहणी

झाडे पडल्याची माहिती मिळताच आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सावनार येथे जाऊन पडझडीची पाहणी केली. घराच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी तलाठ्यांना दिले. दरम्यान, सायंकाळी मये-पैरा रस्त्यावर एक भलेमोठे झाड कोसळले. झाडाच्या पडझडीत आर्थिक नुकसान टळले असले, तरी वाहतुकीवर परिणाम झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com