

म्हापसा : माडेल-थिवी (ता. बार्देश) येथे बांधकामाधीन घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून भिंतीमध्ये बसवलेल्या (कन्सिल्ड) वीजतारा आणि टीपीएन बोर्ड असा सुमारे ८३ हजार ४३७ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील मेहफुज अली सरकार (वय २१) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
म्हापसा येथील रहिवासी विष्णू महाडेश्वर यांनी याबाबत कोलवाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने माडेल-थिवी येथील त्यांच्या बांधकामाधीन घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर भिंतीमध्ये बसवलेल्या १ मिमी, १.५ मिमी, २.५ मिमी आणि ४ मिमी क्षमतेच्या विविध वीजतारा तसेच ५६ वे टीपीएन बोर्ड असा एकूण ८३ हजार ४३७ रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी तपास सुरू करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(२) आणि ३०५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संशयित मेहफुज अली सरकार याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोलवाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वानंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.