Pramod Sawant|Township Canva, Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांकडून चतुर्थीची भेट! गोमंतकीयांचे स्वस्त घराचे स्‍वप्‍न होणार लवकरच साकार

Affordable Housing Scheme: गोमंतकीयांना १०-१५ लाख रुपयांत सदनिका दोन वर्षांत उपलब्ध करणार; योजना तयार करण्याचे काम सुरु

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य सरकार गोमंतकीयांना १०-१५ लाख रुपयांत तालुका पातळीवर दोन शयनकक्ष असलेल्या सदनिका येत्या दोन वर्षांत उपलब्ध करणार आहे. त्यासाठीची योजना तयार करण्याचे काम सरकारने हाती घेतले असून योजनेचा कच्चा मसुदाही तयार केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजी दूरदर्शनच्या ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात दिली.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठरावीक मार्गावर व शाळा महाविद्यालये सुटण्याच्यावेळी बसमध्ये पिंक फोर्सच्या पोलिस शिपाई तैनात केले जातील, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आता ५० लाख रुपयांचे घर घेणे, हे गोमंतकीयांच्या आवाक्यात राहिलेले नाही. भूखंड घेऊन घऱ बांधणे हे स्वप्नच राहू नये, यासाठी सरकारने ही योजना आणण्याचे ठरविले आहे. गावात अनेकांची घरे आहेत. शहरात राहणारे गोमंतकीय चतुर्थीच्या निमित्ताने गावी जात आहेत. गावी असलेले घर अपुरे पडते किंवा तेथे जमीन मालकी वादामुळे घर बांधायला मिळत नाही. गावात केवळ घरापुरती जमीन असते. आणखीन घरासाठी जमीन नसते. काहीजण असलेलेच घर विस्तारीत करून त्यात स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करतात.

तालुका पातळीवर शंभर सदनिका उभारणार

१) सरकारने तालुका पातळीवर गृहनिर्माण मंडळ किंवा महसूल खात्याच्या जमिनीवर इमारती उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतीत दोन शयनकक्ष असलेल्या सदनिका मूळ गोमंतकीयांना १०-१५ लाख रुपयांत उपलब्ध केल्या जातील.

२) तालुका पातळीवर शंभर सदनिका सरकार बांधणार आहे. त्यामुळे अनेकांचा घरांचा प्रश्न सुटेल. ही योजना लवकरच अधिसूचित केली जाईल. कारण दोन वर्षांत घरे देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

‘म्‍हाडा’धर्तीवर योजना

स्वस्तात घरे मिळावीत, असे स्‍वप्‍न असणारे अनेक गोमंतकीय आहेत. मुंबई-महाराष्‍ट्रात ‘म्‍हाडा’सारखी गोव्‍यात योजना सुरू करावी, अशी मागणी होत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT