Animals in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Government : राज्य सरकार राबवणार ‘प्राणी बचाव’ मोहीम

राज्‍यात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढल्‍याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्‍थानिक पातळीवर समित्‍या काम करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government : राज्‍य सरकारने लहान प्राण्यांच्‍या बचावासाठी सुधारित व्‍यवस्‍थापन योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत प्राण्यांच्‍या जन्‍मावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखरेख समिती नेमणे आवश्‍यक आहे. राज्‍यात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढल्‍याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्‍थानिक पातळीवर समित्‍या काम करत आहेत.

या योजनेअंतर्गत भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे प्रयोजन असून अनियोजित नसबंदीमुळे राज्यात सुमारे दीड लाखापेक्षा अधिक भटक्‍या कुत्र्या-मांजरांची संख्या झाली आहे. योग्य काळजी घेतली जात नसल्‍याने ते जखमी होतात किंवा विविध रोगांनी ग्रासतात. यासाठी राज्‍य सरकारने कुत्र्या-मांजरांची काळजी घेण्यासाठी आणि त्‍यांच्‍या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ही योजना आखली आहे. स्‍थानिक स्‍वराज संस्‍थांनी समित्‍या स्‍थापन करण्याची सूचना केली आहे.

शंभर टक्के अनुदान

सरकारकडून शंभर टक्‍के अनुदान दिले जाईल. कुत्र्यांवर उपचार, शस्रक्रिया, लसीकरण, त्‍यांचा आहार, औषधोपचार, कुत्रे पकडणारे, पशुवैद्यकीय सर्जन, वाहक, भूल शस्रक्रिया साहित्‍य आदीसाठी अनुदान दिले जाईल. 9 लाख रुपयांपर्यंत वाहनासाठी शंभर टक्‍के खर्च, नसबंदीसाठी 1800 रुपये, शेडसाठी 7 हजार, पिंजऱ्यासाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT