Goa Water Conservation Dainik Gomantak
गोवा

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Goa Rainfall Deficit 2026: यंदा पावसाची मोठी तूट राहिल्याने पाणी संवर्धनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सुमारे ५०० बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: यंदा पावसाची मोठी तूट राहिल्याने पाणी संवर्धनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सुमारे ५०० बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

सप्टेंबरच्या पहिल्या १२ दिवसांत राज्यात केवळ ८३ मिमी पाऊस झाला असून, देशात सध्या २८ टक्के पावसाची तूट आहे. गोव्यातील तूट त्याहून अधिक असल्याने सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. गणेश चतुर्थीनंतर एक-एक करून बंधाऱ्यांचे दरवाजे बंद केले जातील. जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांना २२ सप्टेंबर रोजी यासंदर्भात आदेश दिले जातील.

नासाडी टाळण्यासाठी काळजी घ्या : शिरोडकर

यंदा कमी पाऊस झाल्याची दखल नागरिकांनीही घेतली पाहिजे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन शिरोडकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पाणी वाचवा’ मोहीम सुरू केली असून, राज्यात पाणी संवर्धनाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT