Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

New Nursing Institute: राज्यातील परिचारिकांची कमतरता दूर होणार, मडगावात लवकरच नवीन 'नर्सिंग इन्स्टिट्यूट'; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Goa Government Medical Projects: मडगावच्या दक्षिण जिल्हा इस्पितळातील वरील दोन मजल्यावर नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government to Address Nursing Shortage with New Institute in Margao

सासष्टी: सध्या गोव्यात परिचारिकांची (नर्स) कमतरता भासत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी मडगावच्या दक्षिण जिल्हा इस्पितळातील वरील दोन मजल्यावर नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येथे नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी भयंकर प्रयत्न करावे लागले आहेत. अनेक चर्चा करून नंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यांनी मंगळवारी (25 फेब्रुवारी) मडगावात सांगितले.

मोतीडोंगरावर मडगाव (Margao) नगरपालिकेने नगरपालिका प्रशासन संचालनालय व आरोग्य खात्याच्या सहकार्याने नागरी आयुषमान आरोग्य केंद्र सुरू केले असून त्याच्या उद्‍घाटनास ते उपस्थित होते. त्यांनी पुढे सांगितले, की दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ करण्याचा आमचा प्रयत्न असून एन्जिओप्लास्टी व एन्जिओग्राफीबरोबरच ओर्थोपेडिक, न्युरोलॉजी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय गोव्यात १०८ सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी आरोग्य खाते प्रयत्नशील आहे.

कर्करोग (Cancer) चिकित्सेसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ व टाटा हॉस्पिटल यांच्याकडे सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे कर्करोग तपासणी, त्याच्यावरील उपचार पद्धती सोपी व सुरळीत होऊ शकेल. पक्षभेद, धर्मभेद बाजूला सारून समाजातील सर्व घटकांच्या दरवाजापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे व त्याप्रमाणे आम्ही गोव्यातही तसा प्रयत्न करीत आहोत, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार दिगंबर कामत यांनी आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यांच्या काम करण्याच्या पद्धतीची प्रशंसा केली.

दोन आरोग्य केंद्रे

मडगावात कालकोंडा व मालभाट येथे आणखी दोन आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर मडगाव नागरी आरोग्य केंद्राची सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. एका महिन्यात मडगावात सर्व रोगांचे निदान करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT