Vishwajit Rane: अर्थसंकल्पात वैद्यकीय जागांमध्ये करण्यात आलेली वाढ गोव्यासाठी फायदेशीर; विश्वजित राणे

Goa medical : पणजी येथील भाजपच्या मुख्यालयात विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Vishwajit Rane On Medical Seats

पणजी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात वैद्यकीय जागांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. याचा गोव्यालाही फायदा होईल, असं आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी सांगितलं. पणजी येथील भाजपच्या मुख्यालयात आज (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.

पत्रकार परिषदेला भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक आणि पर्यटन मंत्री रोहन खौंटेदेखील उपस्थित होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुढील वर्षी १०,००० वैद्यकीय जागांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. जी पुढील पाच वर्षांत ७५,००० जागांपर्यंत वाढेल, याकडे लक्ष वेधण्यात आलं, असं विश्वजित राणे म्हणाले.

"केंद्रीय अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यात आली आहे. अतिरिक्त ७५,००० वैद्यकीय जागांना मंजुरी देण्यात येईल असं सांगून अर्थमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणात क्रांतीची घोषणा केली आहे. गोवा देखील याचा फायदा होईल. राज्याला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी १०० जागांची अपेक्षा आहे."

"केंद्रीय मंत्र्यांनी केवळ जागांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली नाही, तर त्यासाठी अंमलबजावणीची योजना देखील आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला प्रगतीशील दिशेनं नेत आहेत, हे अर्थसंकल्पातून दिसून येते," असं विश्वजित राणे म्हणाले.

Vishwajit Rane
Goa Beach Shacks: 'सर्व शॅक्सना 11 नंतर खुलं राहण्याची परवानगी द्या; काहीजणांमुळे सर्वांवर अन्याय नको!' कळंगुटच्या आमदारांची विनवणी

पुढे बोलताना विश्वजित राणे म्हणाले, "वैद्यकीय क्षेत्रवार, पर्यटनावर लक्ष केंद्रित केल्याने आरोग्य क्षेत्र आणि पर्यटन उद्योगालाही फायदा होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना गोव्यात मोठ्या प्रमाणात आकर्षित करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nitesh Rane Acquitted
Goa Medical College MBBS Seats
 Nitesh Rane Court Appearance
forest minister vishwajit rane wildlife conservation meeting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com