Harvard University educational program Dainik Gomantak
गोवा

Harvard University: गोवा सरकारचा हार्वर्ड विद्यापीठासोबत ऐतिहासिक करार! विद्यार्थी व शिक्षकांसाठी 'लीडरशीप प्रोग्रॅम'

Educational program by Harvard in Goa: हार्वर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ‘प्रोग्राम फॉर सायंटिफिकली - इंस्पायर्ड लीडरशिप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी राबवण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

Harvard University program for scientifically inspired leadership in Goa

पणजी: हार्वर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ‘प्रोग्राम फॉर सायंटिफिकली - इंस्पायर्ड लीडरशिप’ हा उच्च दर्जाचा शैक्षणिक कार्यक्रम राज्यातील उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीवर आधारित आंतर सांस्कृतिक शिक्षणाचा अनुभव मिळेल.

हा अभ्यासक्रम लिबरल आर्ट्स आणि सायन्स फिलॉसॉफीवर आधारीत असून १० नंतर विशिष्ट प्रवाह निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यापलीकडील कौशल्ये व ज्ञान मिळवण्याची संधी देणार आहे.

राज्य सरकारने हार्वर्ड विद्यापीठासोबत ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. हा करार करतेवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हार्वर्ड विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. डॉमिनिक माओ आणि डॉ. अँड्रिया राईटउपस्थित होत्या.

‘वंचित विद्यार्थ्यांना होणार फायदा’

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘प्रोग्राम फॉर सायंटिफिकली - इंस्पायर्ड लीडरशिप’ हा उपक्रम तीन वेगवेगळ्या गटांना एकत्र आणेल. हार्वर्ड विद्यापीठातील महाविद्यालयीन विद्यार्थी प्रशिक्षकाची भूमिका निभावतील; गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी साहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करतील आणि गोव्याच्या शिक्षण विभागांतर्गत सार्वजनिक शाळांमधील उच्च माध्यमिक विद्यार्थी या कार्यक्रमाचे मुख्य लाभार्थी असतील. ही भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टता, नेतृत्व विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या मुळे वंचित विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

‘गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी’

हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. डॉमिनिक माओ व चारुदत्त यांनी सांगितले की, हार्वर्डमध्ये फक्त श्रीमंत लोक प्रवेश मिळवतात हा एक मोठा गैरसमज आहे. येथे आर्थिक गरज लक्षात घेऊन शिष्यवृत्ती दिली जाते, हे कळल्यावर गोव्यातील विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन मिळेल. हा उपक्रम गोव्याच्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT