Goans Surrenders Indian Passport  Dainik Gomantak
गोवा

Portuguese Passport: ‘पोर्तुगालमधील नोंदणीकृत पासपोर्टबाबत सरकार गंभीर’

Portuguese Passport: पोर्तुगालमध्ये आपल्या जन्माची नोंदणी करणाऱ्या गोमंतकीयांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे.

दैनिक गोमन्तक

Portuguese Passport: पोर्तुगालमध्ये आपल्या जन्माची नोंदणी करणाऱ्या गोमंतकीयांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. आम्ही याविषयावर परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी चर्चा करू. येत्या 17 किंवा 18 तारखेला दिल्लीत त्याबाबत परराष्ट्रमंत्र्यांना निवेदन सादर केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.

आमदार कार्लुस फेरेरा यांच्या गोव्यातील भारतीय पासपोर्ट अचानक रद्द करण्याबाबतच्या खासगी ठरावाला मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

पोर्तुगालला गेलेले लोक हे येथे नोकऱ्या, रोजगार मिळत नाहीत म्हणून गेलेले आहेत. बाहेर गेलेल्या अनेकांची आर्थिक गुंतवणूक बँकांमध्ये आहे, त्याचा परिणाम पुढे होऊ शकतो, याचा विचारही करायला हवा, असे आमदार वीरेश बोरकर यांनी नमूद केले.

भारतावर इंग्रजांचे राज्य होते पण गोव्यावर मात्र पोर्तुगीज अंमल होता. त्यामुळेच गोव्याचे आणि पोर्तुगालचे विशेष असे संबंध आहेत. गोव्यातील नागरिकांचे पोर्तुगालमध्ये नातेवाईकही आहेत आणि बऱ्याचदा गोव्यातील नागरिकांच्या जन्माची नोंद पोर्तुगालमध्येही केली जाते.

शिवाय अनेक गोवेकर पोर्तुगीज पासपोर्ट मिळवतात. त्यावेळी त्यांना भारतीय पासपोर्ट सरेंडर करावा लागतो. त्यातूनच आता अशा गोवेकरांना चिंतेत पडायची वेळ आली आहे. यातूनच गेल्या काही काळात गोव्यातील किमान १०० नागरिकांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT