MLA Vijay Sardesai: मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी क्षेत्रात घुमटासारखे आच्छादनाची निर्मिती (डोम) होत नाही, तोवर तेथे कोळसा हाताळणीत वाढ करण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज विधानसभेत दिले.
फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता. सरदेसाई म्हणाले, वास्कोत कोळसा प्रदूषण बंद झालेले नाही. कर्करोगाला कारण ठरू शकतील असे घटक तेथील हवेत मिसळत आहेत. आता 76 हजार टन कोळसा घेऊन जहाज बंदरात आले आहे.
12 फेब्रुवारी रोजी 1 लाख टन कोळसा घेऊन दुसरे जहाज येणार आहे. तेथे घुमटासारखे आच्छादन घालण्याचे काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे ते काम होईपर्यंत कोळसा हाताळणीत वाढ करण्याची परवानगी सरकारने देऊ नये.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्या फिशमिल प्रकल्पाला दररोज अडीच लाख लीटर पाणी लागते. टॅंकरने पाणी आणले जात नाही, तर एवढे पाणी येते कुठून याची चौकशी होणार का? बायोफिल्टर बसवल्यानंतरही परिसरात दुर्गंधी येते.
तेथे प्रदूषण नाही हे सरकारचे म्हणणे पटणारे नाही. रात्रंदिवस लक्ष ठेवण्यासाठी तेथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शाखा कार्यालय सुरू करावे. हळदोण्याचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेला घातक कचरा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ स्वखर्चाने का झाकते अशी विचारणा केली.
प्रदूषणकर्त्याने भरपाई दिली पाहिजे या तत्त्वानुसार हा खर्च कंपनीकडून का वसूल केला जात नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यावर सिक्वेरा यांनी एका खटल्यात मंडळाकडे ही जबाबदारी आल्याचे नमूद केले. ते म्हणाले, सनराईज झिंक कंपनी बंद पडली.
स्टेट बॅंकेने ती लिलावात विकली. विकत घेणाऱ्यांनी यंत्रसामग्री नेली, पण घातक कचरा मागे ठेवला. तो पिसुर्ले येथे हलवण्यासाठी वाहतुकीवर 14 कोटी रुपये खर्च करावे लागतील. यामुळे परीक्षणानंतर तो फारसा घातक कचरा नसल्याचे लक्षात आल्याने त्याच्या पर्यायी वापरावर विचार सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.