AYUSH Department Dainik Gomantak
गोवा

राज्‍यात 'आयुष'साठी आता स्वतंत्र खाते, मंत्रिमंडळाची मंजुरी; आयुर्वेद, योगाला मिळणार चालना

Goa Government AYUSH Department: आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी या भारतीय उपचार पद्धतींच्या विकासासाठी राज्य सरकारने ‘आयुष’साठी स्वतंत्र खाते स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी या भारतीय उपचार पद्धतींच्या विकासासाठी राज्य सरकारने ‘आयुष’साठी स्वतंत्र खाते स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

सध्या आयुष विभाग आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत उपसंचालकांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. नव्या निर्णयानुसार हे स्वतंत्र संचालनालय म्हणून कार्य करणार असून स्वतंत्र संचालकही नेमण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१४ मध्ये स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केल्यानंतर विविध योजना राज्यांसाठी सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा थेट लाभ घेण्यासाठी स्वतंत्र खाते आवश्यक असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथिक दवाखाने सुरू आहेत. आयुष वैद्यकीय अधिकारी ओपीडीद्वारे रुग्णांना औषधे, उपचारपद्धती तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन देतात. राज्यात सध्या आठ आयुष वेलनेस सेंटर्स कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT