Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Calangute Police Mobile Theft Arrest: कळंगुट परिसरात पर्यटकांना लक्ष्य करून मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कळंगुट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Calangute Police Mobile Theft Arrest
Calangute Police Mobile Theft ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कळंगुट परिसरात पर्यटकांना लक्ष्य करून मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कळंगुट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालमधील दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचे २१ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

धुळे (महाराष्ट्र) येथील धनंजय भाईदास बेडसे (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ जून रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ते मित्रासह कळंगुट पार्किंग परिसरात आले होते. वाहन उभे करून दोघे प्रसाधनगृहात गेले असता, अवघ्या २० ते २५ मिनिटांत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वाहनाचा दरवाजा उघडून दोन महागडे आयफोन लंपास केले. याप्रकरणी कळंगुट पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Calangute Police Mobile Theft Arrest
Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि क्षेत्रीय चौकशीच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर येथील सैन मोल्ला (२७) आणि बिश्वजीत रॉय (२६) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेले २१ हाय-एंड मोबाईल फोन आढळून आले. पुढील चौकशीत धनंजय बेडसे यांचे चोरीस गेलेले दोन्ही आयफोनही हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी सर्व मोबाईल जप्त करून आरोपींना (Accused) अटक केली आहे.

Calangute Police Mobile Theft Arrest
Goa Crime News: 'ती' अवघ्या 15 वर्षांची! बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आलं भयानक सत्य, उत्तर प्रदेशच्या तरूणाला बेड्या

मोबाईल कोणाचे?

जप्त करण्यात आलेले उर्वरित १९ मोबाईल नेमके कोणाचे आहेत आणि आरोपींचा इतर चोरीच्या घटनांशी संबंध आहे का? याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक लक्ष्मी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एसडीपीओ विश्वेश कर्पे आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com