Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

Margao Woman Cheated 33 lakhs: मडगावमधील एका महिलेची ३३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे पोलिसांनी ३३ वर्षीय मोहम्मद रफिज (मूळ बंगळुरू) याला अटक केली आहे.
Margao Woman Cheated 33 lakhs
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून मडगावमधील एका महिलेची ३३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे पोलिसांनी ३३ वर्षीय मोहम्मद रफिज (मूळ बंगळुरू) याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून ‘सोशल व्हेंचर कॅपिटलिस्ट एआय ट्रेडिंग’ नावाच्या एका बनावट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून संशयितांनी संपर्क साधला होता. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून या महिलेच्या विविध बँक खात्यांमधून ३३ लाख ७५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी २४ मार्च रोजी सायबर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. संशयिताला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Margao Woman Cheated 33 lakhs
Goa Cyber Crime: विश्वास ठेवला अन्‌ फसले! गुंतवणूक ॲप, सीबीआय अधिकारी अन् रॅकेटचा पर्दाफाश; दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संशयित सराईत गुन्हेगार

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या फसवणुकीतील ८ लाख रुपये संशयित मोहम्मद रफिजच्या बँक खात्यात वळते झाल्याचे शोधून काढले. ही धक्कादायक बाब म्हणजे, रफिजचे बँक खाते तामिळनाडू आणि गोव्यातील (Goa) इतर दोन सायबर गुन्ह्यांशीही संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com