Kundaim IDC Dainik Gomantak
गोवा

'औद्योगिक वसाहतींना प्राथमिक सुविधा देण्याबाबतही सरकार उदासीन'

कुंडई वसाहतीतील रस्ते सुधारण्यास टाळाटाळ, उद्योजक संघटनेचा आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यातील उद्योगांना चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय करता यावा यासाठी राज्यातील औद्योगिक वसाहतीत चांगल्या रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधा देण्यासही सरकार उदासीन असल्याचा आरोप गोवा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी केला असून त्यासाठी त्यांनी सरकारचा निषेधही केला आहे.

प्रशासन भ्रष्टाचाराने (Corruption) बरबटलेले असून त्याचा परिणाम उद्योजकांना भोगावे लागत असल्याचा आरोप त्यानी केला आहे. ही उदासीनता राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी अडचणीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गोव्यातील (Goa) सर्व औद्योगिक वसाहतीत रस्ते व्यवस्थित नसून कुंडई औद्योगिक वसाहतीत जे रस्ते आहेत त्यावरून वाहने चालविणेही शक्य नाही. ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिल्यावर या साठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

कुंडई रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी केलेली असताना सुरुवातीला निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून हे काम अडवून ठेवले. आता नवीन सरकार (Goa Government) स्थापन झाले तरी या कामाला सुरुवात झालेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. कामाच्या निविदेतील बोलीपेक्षा 20 टक्के कमी बोलीच्या एकापेक्षा जास्त निविदा आल्यास त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना आहे. नेमक्या याच तरतुदीचे कारण पुढे करून कामे अडवून ठेवली जात असल्याचा आरोप कोचकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT