वादळी वाऱ्याने फातोर्डा स्टेडियमचे छप्पर उडाले

20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
Fatorda Stadium Roof Repairing
Fatorda Stadium Roof RepairingDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : रविवारी रात्री अकस्मात आलेल्या वादळी वाऱ्याने फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमच्या वेस्ट स्टॅण्ड वरील छप्पर उडून गेले. यामुळे सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या छप्पराच्या तातडीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे.

Fatorda Stadium Roof Repairing
तुये इलेक्ट्रॉनिक सीटीला लागले अपयशाचे 'ग्रहण'

रविवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. हे छप्पर सुमारे 30 वर्षे जुने असून यापूर्वीच ते बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणूक (Election) आचारसंहितेमुळे हे काम सुरु होऊ शकले नव्हते. या घटनेची क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी त्वरित दखल घेताना संबंधित अभियंत्यांना तातडीने दुरुस्ती (Repair) हातात घेण्याची सूचना केली आहे.

Fatorda Stadium Roof Repairing
सोनसोडोवरील कोसळलेल्या भिंतीची लवकरच दुरुस्ती

मंत्री गोविंद गावडे यंच्याशी संपर्क साधला असता, आज आपल्या खात्याच्या अन्य महत्त्वाच्या बैठका असल्यामुळे घटनास्थळी जाऊ शकलो नाही. मात्र येत्या एक दोन दिवसात मी या स्टेडियमला भेट देऊन स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार असे त्यांनी 'गोमंतक'ला सांगितले. दुरुस्ती काम हाती घेतल्याने आता फातोर्ड्यातील (Fatorda) नेहरु स्टेडियमला नवं छप्पर मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com