Barge Sale Tender Dainik Gomantak
गोवा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Goa Government Barge and Dredger Sale Tender: बंदर कप्तान विभागाने सरकारी मालकीची बार्ज आणि ड्रेजर विक्रीसाठी दुसऱ्यांदा निविदा मागविल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बंदर कप्तान विभागाने सरकारी मालकीची बार्ज आणि ड्रेजर विक्रीसाठी दुसऱ्यांदा निविदा मागविल्या आहेत. दोन्ही यंत्रसामग्रींची एकत्रित राखीव किंमत चार कोटी रुपये निश्चित केली आहे. सध्या ही यंत्रसामग्री बिठ्ठोण येथील मरिन स्लिपवेवर ठेवण्यात आली आहे.

या विक्रीची पहिली घोषणा मे २०२६ मध्ये झाली होती. बार्जची खरेदी २०१४ मध्ये, तर ड्रेजरची खरेदी २०१६ मध्ये करण्यात आली होती. वापर कमी झाल्याचे सांगत ही यंत्रसामग्री विक्रीस काढण्यात आली असली, तरी तिच्या वापराबाबत आणि विक्रीच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्‍यातील महत्त्वाच्या फेरीमार्गांवर गाळ उपसा आणि खोलीकरणाची कामे प्रलंबित असताना, गाळ काढण्यासाठी उपयोगी ठरू शकणारी सरकारी यंत्रसामग्री विकण्याच्या निर्णयामुळे विभागाच्या प्राधान्यक्रमांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. या यंत्रसामग्रीची दुरुस्ती करून पुन्हा वापर करणे शक्य आहे का, याचे स्पष्टीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT