CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Sarkar Tumchya Dari Goa: फोंड्यापासून होणार 'श्रीगणेशा'! 6 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा 'सरकार तुमच्या दारी'; CM सावंतांची मोठी घोषणा

CM Pramod Sawant Announcement: राज्य सरकार पुन्हा एकदा लोकप्रिय असा 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम सुरु करणार आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्य सरकार पुन्हा एकदा लोकप्रिय असा 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम सुरु करणार आहे. येत्या शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी फोंडा तालुक्यासाठी फोंडा येथील राजीव कला मंदिरात या उपक्रमाची औपचारिक सुरुवात होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (4 फेब्रुवारी) मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यानंतर महिन्याला एक या पद्धतीने राज्यातील सर्व तालुक्यांत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम म्हणाजे शासनाच्या विविध योजना, सेवा आणि सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अनेकदा माहितीअभावी किंवा कार्यालयीन प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी प्रशासन स्वतः नागरिकांच्या दारात पोहोचणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला (Women) तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार आहे. दर महिन्याला एका तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात येणार असल्यामुळे संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

एकूणच 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम प्रशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करणारा ठरणार असून शासनाच्या योजना प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नागरिकांचा वेळ, खर्च वाचेल !

या उपक्रमांतर्गत विविध सरकारी खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार असून उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, सामाजिक सुरक्षा योजना, शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा तसेच महिला व बालकल्याणाशी संबंधित योजनांबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: "नुसतं स्टार असून चालत नाही..." वर्ल्ड कपमधील अभिषेक शर्माच्या 'फ्लॉप शो' वर भडकला भारतीय दिग्गज

Vizzy Trophy: दक्षिण, पश्चिम विभागाची विजयी सलामी; मॅकनील हेडली, रामदेव आचार्य यांची 'मॅचविनिंग' अर्धशतके

Indian Football League: धेंपो क्लबचा विजय थोडक्यात हुकला; भरपाई वेळेतील गोल ठरला अवैध, रियल काश्मीरविरुद्ध बरोबरी

फेब्रुवारीतच फुटला वसंताचा बहर! उन्हाचे तेज पिऊन डुलणारी फुलं सांगताहेत उन्हाळ्याची रसाळ गोष्ट

US F-15 Jet Crash: आकाशात घेतल्या गिरक्या अन् क्षणातच जमिनीवर कोसळलं अमेरिकन विमान; इराणनं कुवेतमध्ये पाडलं घातक F-15 फायटर जेट VIDEO

SCROLL FOR NEXT