India Passport Fee Hike: परदेश प्रवास करणाऱ्यांना मोठा झटका! 1 जुलैपासून पासपोर्ट शुल्कात वाढ; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

India Passport Fee Hike From 1 July: भारतात राहणाऱ्या किंवा परदेशात जाण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे.
India Passport
India PassportDainik Gomantak
Published on
Updated on

India Passport Fee Hike From 1 July: भारतात राहणाऱ्या किंवा परदेशात जाण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. येत्या 1 जुलैपासून देशात पासपोर्टसाठी अर्ज करणे अधिक महाग होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट नियम 1980 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करुन सर्व श्रेणींमधील पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. या सुधारित शुल्क रचनेबाबतची अधिकृत अधिसूचना 20 जून रोजी जारी करण्यात आली असून, पासपोर्ट कायदा, 1967 च्या कलम 24 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन केंद्र सरकारने हे नवीन दर लागू केले.

या नवीन रचनेनुसार, प्रौढ अर्जदार आणि प्रौढ श्रेणीत अर्ज करणाऱ्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलांना आता सामान्य प्रक्रियेअंतर्गत 36 पानांच्या नवीन पासपोर्टसाठी 2500 रुपये मोजावे लागणार आहेत. जर हाच पासपोर्ट तात्काळ श्रेणीत काढायचा असेल, तर त्यासाठी तब्बल 5000 रुपये शुल्क आकारले जाईल. मोठ्या आकाराच्या म्हणजेच 60 पानांच्या पासपोर्ट पुस्तिकेसाठी सामान्य श्रेणीत 3500 रुपये आणि तात्काळ प्रक्रियेसाठी 6000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले.

India Passport
VIDEO: कुणी केलं कौतुक, तर कुणी मारले टोमणे; टीम इंडियाच्या टी-20 विश्वविजयावर पाकिस्तानच्या खेळाडूंची 'रिअ‍ॅक्शन' व्हायरल!

या दरवाढीत सर्वात मोठा फटका पासपोर्ट हरवल्यास किंवा खराब झाल्यास बसणार आहे. खराब झालेला किंवा हरवलेला 36 पानांचा पासपोर्ट बदलून मिळवण्यासाठी सामान्य प्रक्रियेत 5000 रुपये आणि तात्काळ श्रेणीत 7500 रुपये मोजावे करावे लागतील. तसेच 60 पानांच्या अशा पासपोर्टसाठी अनुक्रमे 6000 रुपये (सामान्य) आणि 8500 रुपये (तात्काळ) शुल्क निश्चित केले. लहान मुलांचा (अल्पवयीन) 36 पानांचा हरवलेला पासपोर्ट बदलण्यासाठी सामान्य श्रेणीत 4250 रुपये आणि तात्काळसाठी 6750 रुपये मोजावे लागतील.

India Passport
India Population: लोकसंख्या का वाढवता?

पासपोर्ट व्यतिरिक्त इतर संबंधित सेवांवरही याचा परिणाम झाला. भारतात दिल्या जाणाऱ्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC), सरेंडर सर्टिफिकेट, ग्लोबल एंट्री प्रोग्राम व्हेरिफिकेशन आणि इतर प्रमाणपत्रांसाठी आता 750 रुपये शुल्क असेल, तर ओळख प्रमाणपत्रासाठी 1000 रुपये द्यावे लागतील. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी इमर्जन्सी प्रमाणपत्राचे शुल्क 15 अमेरिकन डॉलर्स आणि ओळख प्रमाणपत्राचे शुल्क 50 डॉलर्स असेल, मात्र या परदेशातील सेवांसाठी कोणतीही तात्काळ सुविधा मिळणार नाही. या सुधारित नियमांमध्ये पासपोर्टच्या वैधतेबाबतही स्पष्टता दिली असून, प्रौढांसाठीचा पासपोर्ट 10 वर्षांसाठी तर अल्पवयीन मुलांचा पासपोर्ट 5 वर्षे किंवा ते 18 वर्षांचे होईपर्यंत (जे आधी असेल ते) वैध राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com