Jobs In Goa Dainik Gomantak
गोवा

Jobs In Goa: गोमंतकीयांसाठी सुवर्णसंधी! राज्यात 769 सरकारी पदांसाठी होणार भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या..

Goa Government jobs: राज्य सरकार प्रशासनात विविध ७६९ पदे भरणार आहे. त्यासाठीच्या जाहिराती गोवा लोकसेवा आयोग आणि गोवा कर्मचारी भरती आयोगाने जारी केल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य सरकार प्रशासनात विविध ७६९ पदे भरणार आहे. त्यासाठीच्या जाहिराती गोवा लोकसेवा आयोग आणि गोवा कर्मचारी भरती आयोगाने जारी केल्या आहेत.

राजपत्रित अधिकारी ते कर्मचारी या वर्गातील ही पदे आहेत. आगामी विधानसभा अधिवेशनाआधी विविध खात्यांतील रिक्त पदे राजकीय हस्तक्षेपाशिवाय भरण्यावर सरकारचा भर आहे. काही खात्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी आयोगाकडे माहिती पाठवली नव्हती. त्यांना मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी पत्रे पाठवून माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. गोवा लोकसेवा आयोगाने एकूण ४७ राजपत्रित पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

यात आरोग्य क्षेत्रातील पदांची संख्या लक्षणीय आहे. एकूण पदांपैकी ३२ पदे सार्वजनिक आरोग्य विभागात, ३ पदे आरोग्य सेवा संचालनालयात, १ पद पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवेत, ५ पदे तांत्रिक शिक्षण विभागात आणि ६ पदे कार्मिक विभागात आहेत.

प्रमुख पदांमध्ये गोमेकॉ तसेच शासकीय पॉलिटेक्निक येथे प्राध्यापक पदे, वैद्यकीय-कायदेशीर अधिकारी, तसेच मामलेदार/संयुक्त मामलेदार/दक्षता अधिकारी या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी आहे.

अर्जासाठी १३ मार्चपर्यंत मुदत:

अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी gssc.goa.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ मार्च आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘कर्मचारी निवड’ची ७२२ पदांसाठी जाहिरात

गोवा कर्मचारी निवड आयोगाने विविध शासकीय विभागांतील गट ‘क’मधील एकूण ७२२ पदांसाठी अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

‘कर्मचारी निवड’ कडील रिक्त पदे

  पोलिस शिपाई (पुरुष/महिला) - ३६०

  सशस्त्र पोलिस

शिपाई - ११९

  पोलिस शिपाई वाहनचालक - १११

  वॉर्डन (पुरुष) - ६०

  वन परिक्षेत्र साहाय्यक (राऊंड फॉरेस्टर) - २३

  वन परिक्षेत्र अधिकारी - १३

  वनरक्षक - ९

इतर रिक्त पदे

  तुकडी प्रमुख - ४

  साहाय्यक अधीक्षक (पुरुष) - ४

  मॅट्रन (महिला) - १०

  लास्कर (पुरुष) - ५

  एस्कॉर्ट (महिला) - २

  शिपाई (ग्रीझर) - १

  शिपाई (इलेक्ट्रिशियन) - १

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT