Job Scam: नोकरीचं आमिष, अन् लाखो रुपयांचा गंडा; शांतीनगर येथील तरुणाची महिलेकडून फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल

Job Scam: सुशिक्षित बेरोजगारांना हेरून त्यांना नोकरीचे खोटे स्वप्न दाखवणाऱ्या सायबर भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, फोंडा येथील एका तरुणाला याचा मोठा फटका बसला आहे.
Goa Job Scam
Goa Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: सुशिक्षित बेरोजगारांना हेरून त्यांना नोकरीचे खोटे स्वप्न दाखवणाऱ्या सायबर भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, फोंडा येथील एका तरुणाला याचा मोठा फटका बसला आहे. बजाज फायनान्समध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात महिलेने या युवकाला तब्बल २ लाख १० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.'नोकरी डॉट कॉम'च्या नावाचा वापर

मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा येथील शांतीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाला प्रियांका शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला. तिने आपण 'नोकरी डॉट कॉम' (Naukri.com) या नामांकित पोर्टलशी संबंधित असल्याचे भासवले. समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन केल्यानंतर, तिने या युवकाला 'बजाज फायनान्स'मध्ये तुमची नोकरीसाठी निवड झाली असल्याचे सांगितले. ही नोकरी मिळवण्यासाठी काही प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करावे लागतील आणि त्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागेल, असे आमिष तिने तरुणाला दाखवले.

Goa Job Scam
Goa Road Safety: रस्त्यांवर नियम पाळा, जीव वाचवा! होंडा येथे रस्ता सुरक्षा जनजागृती

उकळली मोठी रक्कम

नोकरीच्या आमिषाला बळी पडलेल्या तरुणाने प्रियांका शर्माने सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर वेळोवेळी पैसे जमा केले. नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क आणि इतर कारणास्तव त्याने एकूण २ लाख १० हजार रुपये संबंधितांना दिले.

Goa Job Scam
Bison In Goa: फोंड्यात गव्यांचा भररस्त्यात 'नाईट आऊट'! खडपाबांध ते ढवळी परिसरात नागरिकांची उडाली घाबरगुंडी; वन खात्याकडे बंदोबस्ताची होतेय मागणी

मात्र, पैसे भरूनही नोकरीचे नियुक्ती पत्र (Appointment Letter) न मिळाल्याने आणि त्या महिलेचा संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com