Goa Social Media Ban Dainiak Gomantak
गोवा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया होणार मर्यादित, मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून रिपोर्ट पाठवणार केंद्राला; मंत्री खंवटेंनी स्पष्टच सांगितलं

IT Minister Rohan Khaunte : राज्‍यातील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्‍याचा विचार राज्‍य सरकारने चालवला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यातील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्‍याचा विचार राज्‍य सरकारने चालवला आहे. त्‍यासंदर्भातील दस्‍तावेज माहिती–तंत्रज्ञान खात्‍याने तयार केलेला आहे. याबाबत भागीदारांकडून सल्लेही घेण्‍यात आलेले आहेत. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

यांच्‍याशी चर्चा करून हा दस्‍तावेज केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्‍याकडे मान्यतेसाठी पाठवण्‍याचाही निर्णय आयटी खात्‍याने घेतला आहे. याबाबत बोलताना गोव्‍याचे आयटीमंत्री रोहन खंवटे म्‍हणाले, १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा मर्यादित वापर आणि एआय धोरणाबाबत शिक्षण संस्‍था आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांसोबत बैठक घेण्‍यात आली. त्‍यात एआयवर आधारित शैक्षणिक साधनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सोशल मीडियाचा पर्याय म्हणून कसा वापर करता येईल, याबाबत आम्ही संबंधित घटकांचे अभिप्राय घेतले आहेत.

त्‍यात सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्‍यमांची १६ वर्षांखालील मुलांना गरज नसते. त्‍यात ती विनाकारण वेळ घालवतात. त्‍याबदल्‍यात गुगल, एआय यांचा वापर झाल्‍यास मुले अधिकाधिक गोष्टी शिकतील, असा सल्ला शिक्षण संस्‍थांकडून मिळाला. त्‍यानंतर याबाबतचे दस्‍तावेजही आम्‍ही तयार केलेले असून, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्‍याशी चर्चा करून हा दस्‍तावेज केंद्रासमोर सादर केला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

‘एआय’चा मसुदा ४ मेपासून खुला

गोव्याला उच्च-तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत मंत्री खंवटे यांनी गोव्याच्या ‘एआय’ धोरणाचा मसुदा येत्‍या ४ मेपासून सूचना आणि हरकतींसाठी खुला करण्‍यात येणार आहे. ‘‘हा मसुदा तयार करण्यापूर्वी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या घटकांशी सखोल चर्चा करण्यात आली होती, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT