New education policy Goa X
गोवा

Goa Education: शिक्षण नियमावलीत होणार मोठे बदल! शैक्षणिक वर्ष, सुट्ट्यांबाबतीत सुधारणा प्रस्तावित; हरकती सादर करण्यासाठी दिली मुदत

Goa Academic Year Restructuring: उन्हाळी सुट्टी मे 1 पासून पाच आठवड्यांसाठी, दिवाळी सुट्टी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तीन आठवड्यांसाठी असेल.

Sameer Panditrao

New school rules in Goa 2025

पणजी: गोवा सरकारने गोवा शालेय शिक्षण नियमावली, 2025 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या असून, हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.

या नव्या प्रस्तावानुसार, इयत्ता पहिली ते पाचवी आणि नववीचे वर्ग जून ते एप्रिलपर्यंत, तर इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग एप्रिल ते मार्चपर्यंत चालणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी एक आठवड्याची विश्रांती असेल.

उन्हाळी सुट्टी मे 1 पासून पाच आठवड्यांसाठी, दिवाळी सुट्टी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तीन आठवड्यांसाठी असेल. गणेश चतुर्थीसाठी एका आठवड्याची सुट्टी दिली जाऊ शकते, मात्र गमावलेले दिवस भरून काढावे लागतील. ख्रिसमस सुट्टी 24 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत असेल. या बदलांबाबत शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने करण्‍यात येत आहे. २०२३ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया २०२८ पर्यंत पूर्णत: मार्गी लावण्‍याचे ध्‍येय शिक्षण संचालनालयाने नजरेसमोर ठेवले आहे. त्यामुळे नवनवीन निर्णय, बदल या धोरणाच्या अनुषंगाने घेतले जात आहेत.नवा अभ्यासक्रम, शिक्षकांना प्रशिक्षण, शैक्षणिक वर्ष बदल असे महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. त्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांच्‍या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT